Manoj Parab Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

मनोज परब रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

थिवी आणि वाळपई मतदारसंघातून मनोज परब निवडणूक लढवण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी : रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मनोज परब आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. (Manoj Parab Revolutionary Goans News Update)

मनोज परब यांनी गोवा सुराज पक्षाची साथ सोडत आपला रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष स्थापन केला होता. निवडणूक आयोगाने रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाला फुटबॉलचं चिन्हही दिलं आहे. आता मनोज परब थेट निवडणुकीच्या (Goa Assembly Elections) रिंगणात उतरले आहेत. वाळपई आणि थिवी या दोन मतदारसंघातून मनोज परब निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान गोवा सुराज पक्षाने रेव्हॉल्युशनरी गोअन्सला (Revolutionary Goans) मदत करताना त्यांचा छुपा अजेंडा उघड केला नव्हता. मात्र, उमेदवार घोषित करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मर्जीतील काही व्यक्तींना उमेदवारी देण्याचा दबाव आणल्याने त्यांच्याशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेण्यात आला असे म्हणत मनोज परब यांनी गोवा सुराजचे सर्व आरोप खोडून काढले.

गोवा सुराज पक्षाचे नेते इनासिओ वाझ यांनी निवडणुकीत पाच जागांची मागणी केली होती तसेच दाबोळी येथील मतदारसंघात कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्याविरुद्ध उमेदवार उभा न करण्याची अट घातली होती. त्यांचे दिवसेंदिवस सल्ले देण्याचे सुरू झाल्यावर त्यांना दूर ठेवण्यात आले. मिकी पाशेको यांच्याकडून मदत घेऊन आरजीविरुद्ध ते आरोप करत सुटले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा किंवा आरोप सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा मनोज परब यांनी (Manoj Parab) दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT