Desmond Costa Goa Revolution Dainik Gomantak
गोवा

Desmond Costa Goa Revolution: ठाम उभे राहून क्रांती करण्याची गरज... गोव्यातील तरुणांनी संघटना उभारावी

Goa Revolution: आज प्रत्येक राजकीय पक्षाला युवा आणि विद्यार्थी आपल्यासोबत असावा, असे वाटते. असा एक समाज आहे की आपले डोके न वापरता इतरांच्या मर्जीनुसार वागेल, असा युवक आणि विद्यार्थी यांसारखा स्फोटक वर्ग नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

सुदेश तु. मळकर्णेकर

आज प्रत्येक राजकीय पक्षाला युवा आणि विद्यार्थी आपल्यासोबत असावा, असे वाटते. असा एक समाज आहे की आपले डोके न वापरता इतरांच्या मर्जीनुसार वागेल, असा युवक आणि विद्यार्थी यांसारखा स्फोटक वर्ग नाही. यामुळे सर्व क्षेत्रातील पुढारी अगर दलाल युवकांचे साधन म्हणून वापर करून घेत आहेत. आपल्या देशात तरुणांची म्हणून स्वतंत्र अशी चळवळ अस्तित्वात नाही. तो वापरला जातो आणि त्यासाठी कुणी जगताना, अगर योजना आखत असताना दिसत नाही. म्हणूनच पक्ष, पंथ व संप्रदायानुसार युवकांची संघटना ही आजच्या काळाची गरज आहे.

आज कुठलेही सरकार असो ते तरुणांचे पंख छाटते. ना ना तर्‍हेच्या स्कीम अमलात आणून तरुणांना मासिक पैसे काम न करता मिळतील, याची काळजी घेते. कारण पैशांच्या आमिषाने एक गठ्ठा मते अमुक अमुक पक्षाकडे राहतात. आजची युवा पिढी चाळीस ते पन्नास लाख रुपयांची लाच देऊन नोकरी मिळविण्यास तयार आहे. याचाच अर्थ असा की सरकारी नोकरी मिळाली की ते तीस चाळीस लाख लाच घेऊनच भरपाई होणार. अन्यथा दुसरा अर्थ असा की तीस चाळीस लाख रुपयांनी आपला स्वत:चा व्यापार/व्यवसाय करावा, हे त्यांना पटत नाही. कारण धंदा-व्यवसाय करण्यासाठी सरकारी योजना इतक्या खराब आहेत की त्या पूर्ण करेपर्यंत सात आठ वर्षे निघून जातात आणि त्यानंतरही व्यवसाय केला तर सरकारी कायदा पाळणे त्यांना शक्य नसते.

विद्यार्थी चळवळीबद्दल बोलावयाचे झाले तर गोव्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या काही चळवळी झाल्या आणि त्या यशस्वी झाल्या. कारण गोव्याचा विद्यार्थी हा कुठल्याच राजकीय किंवा उद्योगपतीच्या दावणीला बांधलेला नव्हता.

इतिहासात जे घडले नाही ते घडू शकते, नव्हे तर घडवून आणता येते अशी आकांक्षा बाळगून हे तरुण इतिहास घडवीत असतात. तेच वर्तमानही घडवीत असतात. यालाच आपण आस्तिक दृष्टी म्हणतो. माणसे कितीही दुष्ट किंवा दुर्जन असोत, त्यांच्या आतील सैतानही आपण जिंकू शकतो. त्यांचा हृदयातील देवालाही आपण जागवू शकतो. असे जो झाला तो खरा तरुण. म्हणूनच तरुण कमालीचा आशावादी असावा लागतो. आशानिष्ठ असावा लागतो. निराशा हा शब्द त्याच्या कोशातच नसतो. नव्या धर्मानुसार ज्याचा स्वत:वर विश्वास नाही ते नास्तिक. आज सर्वत्र युवकांमध्ये निराशा आढळून येते याची कारणे अनेक आहेत. काही समाजाने निर्माण केलेली आहेत तर काही त्यांची स्वत:ची आहेत. नैराश्यापोटी आजचा तरुण ज्योतिषी, जोगी आणि जुगार यांच्यामागे लागू पाहत आहे.

आजचा तरुण हा राजकीय पक्षाच्या नांगराला बांधला गेला आहे. राजकीय पक्ष चुकत असतील आणि राज्याचे अथवा देशाचे नुकसान होत असेल तर तो ‘ब्र’ काढत नाही.

कित्येक वर्षांपूर्वी गोव्यात तरुणाने क्रांती घडवून आणली. ५०% कन्सेशन विद्यार्थ्यांना बससेवेत मिळावे यासाठी आणि मार्क्स स्कॅन्डलविरोधात, अशा विजयी क्रांत्या घडवून आणण्यात आल्या. त्यात डेसमंड कॉस्ता, मोहनदास लोलयेकर, संदेश प्रभुदेसाई, क्लिओफात आल्मेदा, सतीश सोनक यांनी विद्यार्थ्यांना घडवून आणले. कारण ते कोणत्याही उद्योगपती अथवा राजकारण्याशी संबंधित नव्हते. त्यांनी जो पाया घालून दिला, तो कळसापर्यंत नेण्याची तयारी असेल तर आजच्या युवकांनी म्हादई प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, बेरोजगारी प्रश्न, पक्षांतर करणाऱ्या नेत्याविरुद्ध ठाम उभे राहून क्रांती करण्याची गरज आहे. पण आजच्या तरुणात ही वृत्ती लोप झाल्याचे पाहण्यात येते.

क्रांती घडवून आणण्यासाठी कमीत कमी तीन पिढ्या लागतात. पहिली पिढी शरणागतीच्या वातावरणात जगते. दुसरी पिढी निषेध व्यक्त करते व विरोध करण्याची कुवत अजमावते, तर तिसरी प्रत्यक्ष कृती करते. या देशात आई-वडिलांचे ऐकणारे जन्माला आले असते तर या देशाला कधी स्वातंत्र्य मिळाले असते का? या देशात आई-बाबांचे न ऐकणारे बंडखोर होते म्हणूनच या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. आपला मुलगा जमदग्नीची आज्ञा ऐकून रेणुकेची गर्दन छाटणारा परशुराम व्हावा की अन्यायाच्या प्रतिकारामध्ये सख्ख्या बापाविरुद्ध बंड करून उठणारा भक्त प्रल्हाद व्हावा हे आपणास ठरविण्याची आज वेळ आली आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT