House Collapsed At Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News: घराचे बांधकाम कुणीही रोखलेले नाही; नगरसेवक आमोणकर

House Collapsed At Margao: घराची पूर्णत: पडझड होऊ शकते म्हणून काम करू नका अशा सूचना केल्‍या होत्‍या अशी माहिती नगरसेवक आमोणकर यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

निवृत्त हाेमगार्ड विमल शिरोडकर हिच्‍या घराची दुरुस्‍ती मामलेदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बंद पाडली, असा जो आरोप केला जात आहे, त्‍यात तथ्‍य नाही. शिरोडकरच्‍या घराची आणखी एक भिंत कोसळण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे अशा स्‍थितीत सुरक्षेचे उपाय न घेता कुठलेही काम हाती घेतल्‍यास घराची पूर्णत: पडझड होऊ शकते, ही भीती लक्षात ठेवूनच सासष्टीचे मामलेदार प्रताप गावकर यांनी कुठलेही काम करू नका, अशा सूचना केल्‍या होत्‍या, अशी माहिती या भागाचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी दिली.

या घराच्‍या मुद्यावरून काहीजण मुद्दाम राजकारण करू पहात आहेत, असा आरोप त्‍यांनी केला. स्‍थानिक आमदार दिगंबर कामत यांचे नाव बदनाम करण्‍यासाठी काहीजण मुद्दाम अशा वावड्या पसरवितात. शिरोडकर हिचे घर कोसळल्‍याचे समजल्‍यावर सर्वांत प्रथम आपण आणि आमदार दिगंबर कामत हेच तिथे धावून आले होते. शिरोडकर यांना पक्‍के घर बांधून देण्‍यासाठी आमचे प्रयत्‍न चालू आहेत, अशी माहिती आमोणकर यांनी दिली.

दरम्‍यान, खारेबांद या भागात आणखी एका मातीच्‍या घराची पावसामुळे पडझड झाली, अशी माहिती आमोणकर यांनी दिली. या घराची पहाणी करून त्‍याही घरमालकाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्‍न चालू आहेत, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT