Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन सेवेत घ्यावे: रोहन खंवटे

मागणी आज पर्वरीचे आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) व आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी शून्यतासावेळी विधानसभेत केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात अनेक खात्यात 5 वर्षाहून अधिक काळ कंत्राटी पद्धतीवर कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची तसेच त्यांना वयामध्ये शिथिलता देण्याची मागणी आज पर्वरीचे आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) व आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी शून्यतासावेळी विधानसभेत केली. सरकारने संजय स्कूल, आयडीसी, आरडीए या खात्यातील कर्मचार्यांना सातव्या वेतनाची अंमलबजावणी केली नाही व थकबाकीची रक्कम अजून दिलेली नाही. काहींची ग्रच्युईटी व निवृत्तीवेतन रक्कमही देण्यात आलेली नाही ती दिली जावी.

कंत्राटी पद्धतीवर काम करत असलेल्यांना पाच वर्षे पूर्ण झाल्यास खात्यात रिक्त होणाऱ्या पदावर सेवेत घेण्याची योजना होती मात्र सरकारने दहा हजार नोकऱ्यांच्या जाहिराती देऊन या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यांमुळे या कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्यात यावे. पोलिस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना जबरदस्तीने जागा रिक्त करण्याची सक्ती पोलिस महासंचालकांकडून केली जात आहे. ही सतावणूक थांबवण्याची मागणी आमदार खंवटे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025: 'पर्रीकरांनी हा महोत्सव गोव्यात आणला ही मोठी भाग्याची गोष्ट', तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे गौरवोद्गार

Taleigao: 'माझे जीवन धोक्यात, मला या रस्त्यांवरून प्रवास करण्याची भीती वाटते'; ताळगावमधील दुरवस्था, सोशल मीडियावर पोस्ट Viral

Goa Crime: गोव्यात आला कामाच्या शोधात, सोबत आणला गांजा; ओडिशातील 29 वर्षीय युवकाच्या आवळल्या मुसक्या

Goa Politics: खरी कुजबुज; घोडा काँग्रेसच्या वाटेवर?

Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT