shuttle bus dainik gomantak
गोवा

गेली दोन वर्षे बंद असलेली वास्कोची कदंब शटल बस सर्विस पुन्हा सुरू करा; प्रवाशांची मागणी

शटल बस सर्विसह वातानुकूलित बस चालू करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

वास्को : कोविड काळापासून गेली दोन वर्षे बंद असलेली वास्कोची कदंब शटल बस सर्विस पुन्हा चालू करण्याची लोकांकडून मागणी होत आहे. नियमित फेऱ्या होत नसल्याने सरकारी तसेच बिन सरकारी कर्मचाऱ्यांना हाल सहन करावे लागत आहेत. तसेच या मार्गावर वातानुकूलित बस चालू करण्याची मागणी होत आहे. (Resume Vasco shuttle bus service, which has been closed for the last two years)

वास्को येथील कदंब शटल बस सर्विस २०१९ साली कोविड (Corona) काळापासून बंद करण्यात आली होती. नंतर मध्यंतरी कोविडचा प्रसार कमी झाल्याने पणजी व मडगाव मार्गावरील फक्त दोन बस चालू केल्या. दरम्यान सदर बसेस सकाळी कामावर जाणाऱ्या व संध्याकाळी घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी पडतात. त्यामुळे त्यांची तारांबळ उडते. सकाळी कामावर जाताना तासन् तास बस स्टॅन्ड वर घालवावा लागतो. तसेच संध्याकाळी कामावरून येताना रात्रीचे ८ वाजतात. तर वास्कोहून संध्याकाळी शेवटची शटल बस ६:३० वाजता तर पणजीहून (Panji) रात्री ७ वाजता सुटत असल्याने उशिरा कामावरून सुटणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सदर शटल बस सेवेच्या फेऱ्यांसह बस संख्येत वाढ करावी अशी मागणी येथील लोकांकडून होत आहे. त्याचबरोबर शटल मार्गात वातानुकूलित दोन बसेस सोडण्याचीही मागणी होत आहे.

दरम्यान या विषयी कदंब महामंडळाचे चेअरमन दीपक नाईक यांना विचारले असता आपण नुकतीच महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वास्को (Vasco) मार्गावरील शटल फेऱ्यात वाढ करण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे याचा फायदा लोकांना होणार आहे. तसेच शटल बस सेवेत वाढ करताना येथून दोन वातानुकूलित बस (AC Bus) सेवेचीही वाढ करणार असल्याचे ते म्हणाले. या विषयी विचार विनिमय चालू असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान वास्को खारीवाडा येथे असलेला शटल बस स्टॅन्ड मुंडवेल येथील कदंब बसस्थानकावर (Kadamba bus stand) हलविण्यात यावा अश्याही मागणीला जोर धरला आहे. कारण वास्को खारीवाडा शटल बस स्थानकावरील बस सुटण्यास वेळ लागणार असे सांगण्यात येते तेव्हा लोकांना दुसरी बस पकडण्यासाठी लोकांना मुंडवेल कदंब बसस्थानकावर जावे लागते. त्यासाठी त्यांना त्या बस स्थानकावर जाण्यासाठी दुसरी बस पकडून बस स्थानक गाठावे लागते. त्यासाठी १० ते १२ रुपये मोजावे लागतात. हा भुर्दंड थांबवण्यासाठी सदर शटल बस स्टॅन्ड मुंडवेल येथे हलविण्याची मागणी नियमित प्रवास करणाऱ्या लोकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT