Damodar Mawjo Dainik Gomantak
गोवा

सत्तेला माज चढला की निर्बंध लादले जातात : दामोदर मावजो

पुढचे संमेलन गोव्यात घ्या - सहकार्य करू

दैनिक गोमन्तक

मुंबई : सत्तेला माज चढला की निर्बंध लादले जातात असे परखड मत कोकणी साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. साहित्यामध्ये सत्ताधाऱ्यांना चिअर्स करणारे अनेक चिअर्स लीडर्स तयार झाले आहेत. हे चिअर्स लीडर्स सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कृतीलाही प्रोत्साहन देत आहेत असे ही ते यावेळी म्हणाले.(Restrictions are imposed when power rises: Damodar Mawjo)

यावर पुढे बोलताना ते म्हणाले कि, साहित्य हे कालानुरुप बदलणारे असते. त्यामूळे आवडत नाही म्हणून साहित्य जाळणे, अशा साहित्यावर बंदी घालणे योग्य नाही. आणीबाणीला साहित्यिकांनी प्रखर विरोध केला होता. दुर्दैवाने आज ते धाडस कोण ही दाखवत नाही. हे वेदनादायी असल्याचं ही ते यावेळी म्हणाले. तसेच लेखक हा बंडखोरच असला पाहीजे तो घाबरट असू नये असे ते म्हणाले. तसेच पुढचे संमेलन गोव्यात घ्या. सहकार्य करू. सर्व वाद संवादातूनच मिटतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात बोलताना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी बोलताना मराठवाडा ही संतांची आणि चळवळीची भूमी आहे. मराठवाडय़ात तेलगू, उर्दू, कन्नड, मराठी भाषा बोलल्या जात असल्या तरी येथे मराठी भाषेचा दबदबा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याच मत व्यक्त केले.

साहित्य हे व्यावहारिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा विविध पद्धतीचे असू शकते. इतर भाषांतील ग्रंथ मराठीत यावेत. कुराण, बायबल, उपनिषदे यांसारखी अजरामर साहित्य निर्माण व्हावीत. येणारा काळ हा डिजिटल आहे. त्यामुळे डिजिटल स्वरूपात साहित्य निर्माण व्हावे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले. असे असले तरी एकूणच साहित्य संमेलन वेगवेगळ्या मुद्यांनी चर्चेत आलं आहे. तर साहित्य संमेलनात वेगवेगळ्या मुद्यांवरुन उफाळलेला वाद हा साहित्यप्रेमींच्या जिव्हारी लागणारा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT