Drinking Water Supply Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa: वेर्णा येथे पाईपलाईनला गळती; दक्षिण गोव्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Water Supply In South Goa: कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को व सासष्टीमधील बाणावली, नुवे, कुडतरी मतदारसंघ आणि सांत आंद्रे मतदार संघातील काही भागात मर्यादित पाणी पुरवठा होईल.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: दक्षिण गोव्याला जलपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या वाहिनीत बिघाड झाल्याने आज व उद्या मुरगावसह आजूबाजूच्या परिसरात मर्यादित पाणीपुरवठा होईल, असे पेयजल विभागाने कळवले आहे. आजपासून (१४ मे) दोन दिवस १५ मे पर्यंत मर्यादीत पाणी पुरवठा होणार असल्याचे खात्याने म्हटले आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यात नागरिकांना जपून पाणी वापरावे लागणार आहे.

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को व सासष्टीमधील बाणावली, नुवे, कुडतरी मतदारसंघ आणि सांत आंद्रे मतदार संघातील काही भागात मर्यादित पाणी पुरवठा होईल. आज (१४ मे) आणि उद्या (१५ मे) रोजी मर्यादीत पाणी पुरवठा होणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

साळावली जलपुरवठा प्रकल्पाच्या मोठ्या जलवाहिनीला वेर्णा येथे गळती लागल्याने काम करणे अनिवार्य बनले आहे. त्याचा दक्षिण गोव्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

SCROLL FOR NEXT