Restaurant construction in varca will not be demolished by NGT Dainik Gomantak
गोवा

वार्का येथील रेस्टॉरंटचे बांधकाम पाडण्यास एनजीटीकडून स्थगिती

बांधकामाचा वादग्रस्त भाग खातरजमा केल्याशिवाय पाडला जाऊ नये

दैनिक गोमन्तक

मडगाव : वार्का येथील एका रेस्टॉरंटचा भाग पाडण्याच्या आदेशाला एनजीटीच्या नवी दिल्लीतील प्रधान खंडपीठाने सशर्त स्थगिती दिली आहे. या प्रकरणी सदर रेस्टॉरंटच्या (restaurant) व्यवस्थापनाने दाखल केलेल्या याचिकेवर हा निवाडा देताना बांधकामाचा वादग्रस्त भाग खातरजमा केल्याशिवाय पाडला जाऊ नये असे स्पष्ट केले आहे.

अर्जदाराने जरी सदर बांधकाम हे विकासवर्ज्य विभागापासून दूर आहे हे दाखवून देणारे कोणतेच पुरावे सादर केलेले नसले तरी खबरदारी म्हणून त्याला सुस्पष्ट निवेदन सादर करण्याची संधी दिली जात असल्याचे आदेशात म्हटले आहे.

संबंधिताला हे सारे पंधरा दिवसांच्या मुदतीत गोवा (goa) किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करावे लागेल. खंडपीठाने गोवा प्राधिकरणास चेन्नईतील एनसीएससीएमच्या सहकार्याने त्याची खातरजमा करण्यास सांगितले आहे. त्या अहवालाचा अभ्यास करून या प्रकरणी नवा आदेश जारी केला जाईल. नव्या आदेशासंदर्भात दाद मागण्याची मुभाही अर्जदारास राहणार आहे.

दरम्यान, काणकोण (Canacona) येथील एका रिसॉर्ट प्रकरणात इनासियो डॉम्‍निक परेरा यांनी दाखल केलेल्या एका याचिकेसंदर्भात प्रधान खंडपीठाने अर्जदारास त्याच्या दाव्याबाबत अधिक तपशील प्राधिकरणासमोर सादर करण्याची सूचना केली आहे. एका संयुक्त समितीने केलेल्या तपासणी अहवालाकडे तसेच प्रकल्पाच्या पुरस्कर्त्याने सादर केलेल्या अहवालाकडेही लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT