कळंगुट काँग्रेस समितीच्या सदस्यांचा संयुक्त राजीनामा  Dainik Gomantak
गोवा

Goa Election:..त्यामुळे कळंगुट काँग्रेस समितीच्या सदस्यांचा संयुक्त राजीनामा

मायकल लोबो यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे काँग्रेस सदस्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Election: गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने आता राजकीय वर्तुळातील गोष्टींना उधाण आले आहे. कचरामंत्री मायकल लोबो (Michael Lobo) नुकतेच काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र चर्चासत्र सुरू आहे. लोबो यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे काँग्रेस सदस्यांमध्ये मात्र नाराजी वाढली आहे.

कळंगुट काँग्रेस समितीच्या (Calangute Congress Committee) सदस्य आग्नेल फर्नांडिस (Agnel Fernandes), जोजफ सिक्वेरा आणि अँथनी मिनेझिस यांनी आपली नाराजी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट दर्शवली आहे. आग्नेल फर्नांडिस, जोजफ सिक्वेरा, अँथनी मिनेझिस यांनी मायकल लोबो यांना काँग्रेसमध्ये प्रवेश स्वीकारला असल्यामुळे त्यांनी आता पक्षातून राजीनामा देण्याचे ठरवले आहे. शिवाय आता ते कॉंग्रेसविरुद्धच उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, 'मायकल लोबो यांना पक्षात घेतल्यामुळे आम्ही फार दु:खी झालो आहोत. गेले 10 वर्षे आम्ही पक्षाशी एकनिष्ट आहोत, पण पक्षाने आमच्यावर अन्याय केला आहे. तरीही आम्ही पक्षात होतो. आम्ही हक्काचे उमेदवार असताना देखील त्यांनी आता कचरामंत्र्यांना पक्षात घेतले आहे, याबद्दल आमची हरकत नाही, पण आता आम्ही पक्षात राहणार नाही हे नक्की.'

ते पुढे म्हणाले, 'ही सगळी परिस्थिती बघता आता आम्ही संयुक्त राजीनामे देण्याचे ठरवले आहे. आम्ही पुढेही एकत्र राहणार आहोत, आणि आता कॉंग्रेसविरुद्ध लढा देणार आहोत. 'काँग्रेस हटाव गोवा बचाव' ही मोहीम राबविण्याचा निर्धार आम्ही केला आहे.' त्यामुळे आता गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Goa Assembly Elections 2022) कॉंग्रेसच्या पुढील हालचालीवर आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT