Wet Waste Processing Unit Dainik Gomantak
गोवा

Wet Waste Issue: ओला कचरा जातो कुठे? लाखोंची यंत्रणा पडून; कचरा नसल्याने प्रक्रिया नाही

Waste Management: प्रत्यक्षात मात्र सरकारने लाखो रुपयांची अद्ययावत यंत्रणा पंचायतींना पुरवूनही ती विनावापर सडत ठेवण्यात आली असल्याचे दिसून आले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छ भारत योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून बाणावली पंचायतीला दिलेली यंत्रणा झाकून ठेवण्यात आली आहे. ती यंत्रणा तर विनावापर आहेच, या उलट ओला कचराच गोळा केला जात नसल्याने प्रक्रियेचा प्रश्नच उद्‍भवत नाही. सासष्टीतील ग्रामसभांतून मोठ्या कचरा प्रकल्पांना विरोध होत असून पंचायत पातळीवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारने लाखो रुपयांची अद्ययावत यंत्रणा पंचायतींना पुरवूनही ती विनावापर सडत ठेवण्यात आली असल्याचे दिसून आले. बाणावली पंचायत कार्यालयाच्या बाहेरच अशी यंत्रणा झाकून ठेवल्याचे दिसून आले.

बाणावलीत पंचायत कार्यालयाच्या बाजूला सुका कचरा संकलन केंद्र आहे. रिक्षा, टेम्पोतून गावातील कचरा गोळा केला जातो. केंद्रात त्या कचऱ्याचे यंत्रावर तुकडे करून त्याचे गठ्ठे बांधले जातात. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ नंतर ट्रक पाठवून तो सुका कचरा जाळण्यासाठी कर्नाटकात पाठवते. ओला कचरा गोळा केला जात नाही.

बाणावली हे पर्यटन केंद्र असल्याने हॉटेलांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यातील कचरा जातो कुठे हा प्रश्नच आहे. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून अभियंता पंचायत पातळीवर चौकशीसाठी पाठवला गेल्यावर ओला कचरा जनावरे फस्त करतात असे अजब कारण दिले जाते.

लाखो रुपये खर्चून सरकारने ऑर्गेनिक वेस्ट कन्व्हर्टर हे अजस्त्र यंत्र उपलब्ध केले तरी त्याचा वापर करण्याचे सौजन्य पंचायतीने दाखवलेले नाही असे दिसून आले. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे कचरा संकलन वाहनावर काम करणाऱ्या महिला कामगारांनी हातमोज्यांचा वापर केलेला होता.

आंबेली पंचायतीतही यंत्रणा गंजतेय

बाणावलीलगतच्या आंबेलीतही स्थिती वेगळी नाही. तेथे कचरा प्रक्रीया व संकलनासाठी पक्की शेड उभारण्यात आली आहे. राज्याचे पहिले विरोधी पक्षनेते ख्रि. जॅक सिकेरा यांच्या पुतळ्याच्या मागील भागात ही शेड आहे. त्या शेडमध्ये यंत्रे बसवली आहेत, मात्र त्याचा वापर मात्र केला जात नाही. चकाचक असलेली यंत्रे याचीच साक्ष देत होती. कचरा संकलनासाठी पुरवण्यात आलेली सायकल आता गंजून गेली आहे. काही प्लॅस्टिक कचऱ्याचे तुकडे करून त्याचे गठ्ठे बांधून त्याच शेडमध्ये ठेवले आहेत. ऑर्गेनिक वेस्ट कन्व्हर्टरचे प्लॅस्टिक आवरण देखील काढण्यात आलेले नाही, यावरून ते यंत्र पंचायतीच्या शेडमध्ये पोचल्यापासून त्याचा एक दिवसही वापर झालेला नाही हे दिसून येते. आंबेली पंचायतीला कचरा जाळण्यासाठी लागणारा इन्सिनेरेटरही पुरवण्यात आलेला आहे. त्याचाही वापर झालेला नाही.

असोळणेही कचरा व्यवस्थापन कोलमडले

असोळणे हे गाव तसे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे. गोवा मुक्तीला चालना देण्यासाठी राम मनोहर लोहिया यांच्याशी डॉ. ज्युलियाव मिनेझिस यांनी याच गावातील आपल्या घरी संवाद साधला होता. या गावातही कचरा व्यवस्थापनाचा वाट लागली आहे. सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या मागे कचरा संकलन केंद्र आहे. त्या ठिकाणी भेट दिली असता तेथे कोणीही दिसून आले नाही. शेजारीच असलेल्या शाळा इमारतीत आरोग्य केंद्राचे कर्मचारी होते व वाचनालय खुले होते. कचरा संकलन केंद्र चकाचक होते. यावरून त्याचा वापर कधीच झाला नसावा हे चटकन जाणवत होते. असोळणेतही लाखो रुपयांचा ऑर्गनिक वेस्ट कन्व्हर्टर या कचरा संकलन शेडच्या बाहेर झाकून ठेवला आहे. तो आतमध्येही नेण्यात आलेला नाही. त्यासाठी अजस्त्र क्रेनची गरज भासणार आहे. कदाचित शेडचे छप्परही थोडे हटवावे लागेल. प्लास्टीक कचऱ्याचे तुकडे करणारे यंत्र तर इतके नवीन आहे ती त्याच्या मोटरचे प्लास्टिक आवरण देखील हटवण्यत आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT