Deforestation
Deforestation  dainikgomantak
गोवा

कदंबवरील झाडे तोडल्याबद्दल चिंबल स्थानिकांत चिंता

दैनिक गोमन्तक

पणजी : कदंब पठारावरील हिरवळ नष्ट होत असल्याने चिंबल (Chimbel) स्थानिकांत चिंता पसरत असून वनविभाग आणि राज्य जैवविविधता मंडळावर स्थिकांत नाराजीचा सुर उमटत आहे. तसेच पठारावर होणारी वृक्षतोड वनविभाग (forest department) आणि राज्य जैवविविधता मंडळाने (state biodiversity board) तातडीने थांबवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी पत्राद्वारे केली आहे. (Residents of Chimbel concerned over the Kadamba plateau)

गेल्या चार वर्षांत असे दिसून आले आहे की, दरवर्षी, बहुतेक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात, झाडांना (trees) आग लावून किंवा कापून हळूहळू कदंब पठारावरील (Kadamba plateau) हिरवळ (green) नष्ट केली जात आहे. तसेच या पत्रात पुढे म्हटले आहे की, जेंव्हाही या परिसरात अशा प्रकारची वृक्षतोड केली जाते किंवा नासधूस होते, त्याची माहिती वेळोवेळी संबंधित प्राधिकरणाला रहिवाशांनी पत्राद्वारे दिलेली आहे.

कदंब पठारावरील (Kadamba plateau) हिरवळ नष्ट होत असून त्यात मुख्यतः कोम्यो आणि मोय यासारखी जंगली वनस्पती आहेत. ज्यात कांतन, चुन्ना इत्यादी फळ देणारी झाडे देखील आहेत. या झाडांकडे येथे विविध पक्षी, सरपटणारे प्राणी आणि इतर प्रजाती आकर्षित होतात. तेथील हिरवाईमुळे या भागात अनेक झाडे आणि प्रजतींचे अस्तित्वात आहे. येथे समृद्ध जैवविविधता साखळी तयार झाल्याचेही रहिवाशांनी पत्रात लिहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa Today's Live News Update: फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

SC ने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT