Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: कौले काढून घरात शिरला, OCI कार्डधारकाची हत्या करुन फरार झाला

Goa Crime News: मृत ओसीआय कार्डधारक : कौले काढून घरात प्रवेश; कार घेऊन मारेकरी पसार

गोमन्तक डिजिटल टीम

ओर्डा-कांदोळी येथे घरात एकटाच राहणाऱ्या ६९ वर्षीय ओसीआय कार्डधारक वृद्धाचा धारदार हत्याराने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशयित मारेकरी छपरावरील कौले काढून घरात शिरला आणि त्याने अरनॉल्ड सुवारिस यांची थंड डोक्याने हत्या केली.

हा खून नेमका कशासाठी झाला, याचे कारण सध्या तरी अस्पष्ट आहे. कळंगुट पोलिसांनी विशेष पथकांची नेमणूक करून या प्रकरणाच्या तपासाला गती दिला आहे. सुवारिस हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निपचित पडले होते.

त्यांच्या अंगावर बनियन आणि शॉर्ट पँट होती. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. सुवारिस यांच्या शेजारीच त्यांचे नातेवाईक राहतात. ते घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावेळी घराचा मुख्य दरवाजा सताड उघडा होता. कळंगुट पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक विश्वेश कर्पे, आमदार मायकल लोबो, स्थानिक पंचमंडळी व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक टीम, श्वान पथकाला पाचारण केले.

सुवारिस हे ओसीआय कार्डधारक म्हणजेच कॅनडाचे नागरिकत्व होते. ते मूळचे गोमंतकीय. दहा वर्षांपूर्वी ते गोव्यात आले. तेव्हापासून ते परदेशात येऊन जाऊन होते. त्यांची बहीण-भाऊ हे कॅनडात स्थायिक असतात. याविषयी आमदार मायकल लोबो म्हणाले की, पोलिसांनी आणखी तीव्रतेने भाडेकरू पडताळणी मोहीम राबविणे गरजेचे आहे. तसेच भाडेकरू ठेवणाऱ्यांनी संबंधितांची माहिती पोलिस, स्थानिक पंचायतीला देणे अनिवार्य आहे.

कौले काढून घरात प्रवेश

सुवारिस हे घरात एकटेच राहायचे. ते अविवाहित होते. खुनाची घटना शनिवारी (ता. १३ जुलै) मध्यरात्री २.३५ च्या सुमारास घडल्याचे समोर आले. मारेकऱ्याने छपरावरील कौले बाजूला केली आणि वाशाला नायलॉनची दोरी बांधून तो घरात शिरला. त्यानंतर संशयित आणि सुवारिस यांची झटापट झाली असावी, असे घरातील विखुरलेल्या साहित्यावरून दिसते.

अशाप्रकारे एका अविवाहित व्यक्तीचा खून होणे दुर्दैवी तसेच चिंताजनक आहे. हा पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येते. या प्रकरणात एकापेक्षा अधिक लोकांचा समावेश असू शकतो. हेलीपॅडवर कार सोडून मारेकरी तेथून पळून कसा गेला, हा प्रश्नच आहे. मायकल लोबो, आमदार, कळंगुट.

घटनाक्रम असा...

1. मारेकरी छपरावरील कौले काढून तसेच वाशाला नायलॉनची दोरी बांधून घरात शिरला.

2. घरात उतरलेवेळी मारेकऱ्याच्या पायांचे ठसे भिंतीवर उमटले.

3. घराबाहेरील सीसीटीव्ही काम करत नसले, तरी आतील एका सीसीटीव्हीमध्ये झटापट आणि त्यांच्यातील संभाषण रेकॉर्ड झाले.

4. रात्री घरातून कसला तरी आवाज येत असल्याने घराशेजारील एकाने सुआरिस यांना हाक मारली. मात्र, कोकणीत कुणीतरी ‘काही नाही, मी ठीक आहे’ असे उत्तर दिले.

5. घरातील मौल्यवान साहित्य आणि पैशांचे पाकीट तसेच आहे. त्यामुळे खुनाचे कारण पैसे नसून वेगळे काहीतरी असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT