Goa Medical College Hospital Dainik Gomantak
गोवा

Kolkata Doctor Case: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आजही संपावर; आपत्कालीन सेवा सुरु!

Goa Medical College: गेल्या काही दिवसांपासून कोलकाता येथील महिला डॉक्टरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे.

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांपासून कोलकाता येथील महिला डॉक्टरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ गोवा मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टर आजही (सोमवार, 19 ऑगस्ट) संपावर आहेत. गोवा मेडिकल कॉलेजच्या डीनला त्यांनी पत्राद्वारे माहिती दिली आहे.

दरम्यान, गोवा मेडिकल कॉलेजमधील (Goa Medical College) ओपीडी संपानंतरही सुरु राहणार आहेत. याशिवाय, आपत्कालीन सेवा देखील सुरु राहणार आहेत. गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांनी सांगितले की, विभागप्रमुख आणि सल्लागारांच्या सेवेसह ओपीडी आणि आपत्कालीन सेवा सुरु राहतील.

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ गोमेकॉतील निवासी डॉक्टरांनी शुक्रवारपासून संपाला सुरुवात केली होती. त्यांनी यावेळी सोमवारपर्यंत आपण संपावर असणार आहोत, असे पत्र निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आम्हाला दिले आहे. गार्ड सोमवारी संध्याकाळापर्यंत संपाबाबत भूमिका स्पष्ट करतील असेही डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.

बांदेकर यांनी पुढे सांगितले की, निवासी डॉक्टरांच्या संपादरम्यान रुग्णांची (Patient) गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. ओपीडीमध्ये पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी डॉक्टर देखील आपत्कालीन सेवा आणि शस्त्रक्रियेसाठी तयार आहेत, असेही बांदेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT