Turtle Rescue Dainik Gomantak
गोवा

Tiswadi beach: तिसवाडी येथे 'सिनॉय मायडीस' प्रजातीच्या कासवाला जीवदान

मच्छीमार ग्रासिएस कुतिन्हो यांच्या जाळ्यात अडकले होते हे कासव

गोमन्तक डिजिटल टीम

दाबोळी - वाडे येथील मासळी व्यवसायिक तथा समाजकार्यकर्ते ग्रासिएस कुतिन्हो यांनी आपली सेवा उत्कृष्टरित्या बजाविताना ' सिनॉय मायडीस' प्रजातीच्या कासवाला जीवदान दिले आहे. या कासवाला स्थानिक भाषेत 'हिरवा समुद्री कासव' असे म्हणतात. तिसवाडी मारावेला समुद्रात बुधवार (दि.8) रात्री मासेमारी करताना ग्रासिएस यांच्या जाळ्यात हिरवा समुद्री कासव अडकला.

याबद्दल सविस्तर माहिती अशी कि, बुधवारी रात्री तिसवाडी मारावेला समुद्रात मासे पकडताना कुतिन्हो यांच्या मासळी पकडणार्‍या बोटीच्या जाळ्यात मासळी बरोबर भलामोठा कासव मिळाला. त्यांनी प्रसंगावधान राखत त्या कासवाला जाळ्यातून बाहेर काढले.

नंतर त्याला गुरुवारी (दि. 9) पहाटे पुन्हा मारावेला समुद्रात सोडून जीवनदान दिले. ' सिनॉय मायडीस' या हिरवा समुद्र कासवाचे वैज्ञानिक नाव असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. कासवाचे वजन अंदाजे 25 किलो होते. कासवाला जीवनदान दिल्याने ग्रासिएस कुतिन्हो यांचे सर्वस्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT