Ferry Boat Service in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat : राज्यातील 'या' मार्गावरील फेरीबोट सेवा 15 दिवसांसाठी बंद

नदी जलवाहतूक विभागाचे आदेश

Rajat Sawant

Goa Ferry Boat : पेडणे तसेच बार्देश या दोन्ही तालुक्यांना जवळच्या अंतराने जोडणाऱ्या तसेच शापोरा नदीमार्गे प्रवासी वाहतूक करणाऱ्या कामुर्ली-तुयें जलमार्गावरील फेरीबोट सेवा 15 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश नदी जलवाहतूक विभागाने दिले आहेत.

पेडणे तालुक्यातील शेकडो लोक कामाधंद्याच्या निमित्ताने म्हापसा ते पणजी शहराकडे नियमित स्वरूपात ये जा करत असतात. हे चाकरमानी लोक फेरीबोट सेवेचा वापर करतात.

याबाबत नदी जलवाहतूक विभागाने कळविले आहे की, कामुर्ली-तुयें मार्गावरील कामुर्ली फेरीच्या फेरी रॅम्पच्या दुरुस्तीमुळे 19 एप्रिल 2023 पासून पुढील 15 दिवसांसाठी फेरीबोट सेवा बंद करण्यात आली आहे.

पेडणे तालुक्यातील शेकडो लोक कामाधंद्याच्या निमित्ताने म्हापसा ते पणजी शहराकडे नियमित स्वरूपात ये जा करत असतात. तथापि, पत्रादेवी ते म्हापशापर्यंतच्या महामार्गाचे रुंदीकरण तथा नूतनीकरण केले जात असल्याने तालुक्यातील बहुतेक चाकरमानी लोक म्हापसा शहराकडे ये - जा करण्यासाठी कामुर्ली-तुये जलमार्गावरील फेरीबोट सेवेचा उपयोग करीत असतात.

म्हापसा-पणजी शहराकडे येणारा चोपडे - शिवोलीचा दुसरा मुख्य रस्ता लांब पल्ल्याचा असल्याने बहुतेकांची येथील कामुर्ली-तुये जलमार्गालाच अधिक पसंती असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT