Tilari Dam Repair Work Dainik Gomantak
गोवा

तिलारीच्या दुरुस्ती कामाला पुन्हा सुरुवात! मंत्री सुभाष शिरोडकरांनी दिली महत्वाची माहिती

तिलारी प्रकल्प संपूर्ण उत्तर गोव्याला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रांना पुरण्यासाठी कच्च्या पाण्याचा पुरवठा करते.

Kavya Powar

Tilari Dam Repair Work: तिलारी प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. मात्र सध्या गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमुळे हे दुरुस्तीचे काम काही आठवडे पुढे ढकलण्यात आले. मात्र आता ते काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

तिलारी प्रकल्पातर्फे संपूर्ण उत्तर गोव्याला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रांना पुरण्यासाठी कच्च्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.

या कामामुळे गोव्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल का अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मंत्री शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम सुरू असताना डिसेंबर अखेरपर्यंतच्या कालावधीत कच्च्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत कोणतीही चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्याच्या बाजूने तिलारी कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्राच्या बाजूने अजून कामाला सुरुवात व्हायची आहे. त्यामुळे राज्याकडे पुरेसे कच्चे पाणी आहे आणि तिलारी कालवा बंद केल्यामुळे गोव्यात कोणतीही कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले.

या वर्षी झालेल्या तिलारी आंतरराज्य प्रकल्प नियंत्रण मंडळाच्या बैठकीत मोठे कालवे दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय जूनमध्ये घेण्यात आला होता.

तिलारी कालवा हा तीन दशकांहून अधिक जुना प्रकल्प असून त्याच्या दुरुस्तीचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच एकूण 330 कोटी रुपयांच्या दुरुस्तीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: गिरीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली

SCROLL FOR NEXT