Damaged Road in Goa Sandip Desai
गोवा

Goaतील गणेशभक्तांना खड्ड्यांचे विघ्‍न!

उगवे, धारगळ, कोलवाळमधील खड्डे वाहनचालकांना ठरताहेत डोकेदुखी

दैनिक गोमन्तक

धारगळ: राष्‍ट्रीय महामार्ग होईल तेव्‍हा होईल? पण, महामार्गावर पडलेल्‍या खड्ड्यांची आधी डागडुजी करा, अशी मागणी गणेशभक्त व वाहनचालकांकडून केली जात आहे. उगवे- पेडणे येथे साधारण एक फूट खोलीचे खड्डे पडल्‍याने वाहनचालकांना प्रचंड मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. चाक खड्ड्यात गेल्‍यावर समोरील व मागील बंपर खालच्‍या बाजूने रस्‍त्‍याला घासल्‍याने बंपरचे नुकसान होते. होणाऱ्या नुकसानील जबाबदार कोण? चूक कुणाची आणि भुर्दंड आम्‍हाला का? असा संतप्‍त सवाल वाहनचालकांकडून उपस्‍थित केला जात आहे.

Damaged Road in Goa

राष्‍ट्रीय महामार्गाचे काम सुरू केल्‍यावर ठेकेदाराच्‍या मनमानीकडे सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. केवळ अतिमहनीयांचे हितराखण करून सर्वसामान्‍यांना वेठीस धरले जात असल्‍याच्‍या प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्‍यक्त केल्‍या जात आहेत. उगवे येथील खड्डे वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहेत. एक चुकवायचा, तर दुसऱ्यात चाक जाते. अक्षरश: कसरतच करावी लागते. एवढे करूनही समोरील व मागील बंपर रस्‍त्‍याला घासल्‍याने तुटण्‍याचेही प्रकार घडत आहेत. वाहनांच्‍या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? आमची काय चूक? असा परखड सवाल वाहनचालक उपस्‍थित करीत आहेत. चतुर्थीच्‍या पार्श्वभूमीवर महामार्गावर सध्‍या वर्दळ वाढली असून गणेशभक्तांना खड्ड्यांचे विघ्‍न पार करून प्रवास करावा लागत आहे.

Damaged Road in Goa

मालपे-पेडणेत उद्या रास्‍ता रोको

पत्रादेवी ते महाखाजन-धारगळ पर्यंतच्‍या महामार्गाचे काम सदोष झाल्‍याचा आरोप करून मांद्रेतील ‘आप’ कार्यकर्ते ॲड. प्रसाद शहापुरकर यांनी पेडणे पोलिस स्‍थानकात ‘एफआयआर’ दाखल केली होती. त्‍याबाबत पोलिसांनी एकदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्‍यापुढे काहीच हालचाल झाली नाही. त्‍यामुळे 8 सप्‍टेंबर रोजी न्‍यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्‍याचे ॲड. शहापुरकर यांनी सांगितले. तसेच 8रोजी सकाळी 10.30 वा. मालपे-पेडणे येथे ‘आप’तर्फे रास्‍ता रोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्‍यात येईल. या आंदोलनात ‘आप’चे पुंडलिक धारगळकर यांच्‍यासह पेडणे तालुक्‍यातील ग्रामस्‍थांचा सहभाग असणार आहे.

Damaged Road in Goa

‘काँग्रेस’तर्फे झाडे लावून निषेध

उगवे - पेडणे येथील राष्ट्रीय रस्ता 66 ची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवणे म्हणजे वाहनचालकांची हाडे खिळखिळी होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. खड्डेमय रस्त्यावरून गणेशमूर्ती वाहनातून सुरक्षित कशा नेणार? असा प्रश्‍‍न गणेशभक्त उपस्‍थित करीत आहेत. सरकारने चतुर्थीपूर्वी हे खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Damaged Road in Goa

खड्डेमय रस्‍त्‍याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी पेडणे गट काँग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर व रुद्रेश देशप्रभू यांच्या उपस्थितीत खड्ड्यात कल्पवृक्षाचे रोपटे लावून निषेध नोंदविला. यावेळी त्‍यांनी उपमुख्‍यमंत्री बाबू आजगावकर यांच्‍या अकार्यक्षमतेबद्दल टीका केली.

Damaged Road in Goa

चतुर्थीपूर्वी डागडुजी करावी

राज्‍यात सध्‍या गणेश चतुर्थीची लगबग सुरू असल्‍याने बहुतांश गणेशभक्त आपल्‍या गावी रंगरंगोटी व सजावटीसाठी सुट्टी काढून आवर्जून जात आहेत. महामार्गावर सध्‍या वाहनांची वर्दळही वाढली आहे. वाहनचालकांना खड्डे चुकवण्‍यासाठी अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. सरकारने ठेकेदाराला समज देऊन गणेश चतुर्थीपूर्वी खड्ड्यांची डागडुजी करून घ्‍यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT