Cancon News
Cancon News  Dainik Gomantak
गोवा

काणकोण कदंब बसस्थानकाची दुरुस्ती करा

दैनिक गोमन्तक

काणकोण: शहरातील कदंब बसस्थानकाची त्वरित दुरुस्ती करा, अशी मागणी कॉंग्रेसचे सचिव जनार्दन भंडारी यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नाटो यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 14 दिवसांच्या आत दुरुस्ती कामाला सुरवात न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही या शिष्टमंडळाने दिला आहे. (repair canacona bus stand - JANARDHAN BHANDARI )

2004 साली या बसस्थानकाचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उदघाटन केले होते. त्यावेळी या बसस्थानकाच्या देखभालीसाठी सर्व खर्चाची तरतूद केली असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले होते. काणकोण: शहरा बसस्थानक परिसरात अनेक दुकाने असून येथे वाहनतळही आहे. या ठिकाणी पार्किंगसाठी शुल्क आकारण्यात येते. त्यातून महामंडळाला वर्षाकाठी 30 लाखांचा महसूल मिळतो. मात्र, महामंडळ बसस्थानकाच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.

सध्या या बसस्थानकाच्या गटारावरील लोखंडी जाळ्या तुटल्या असून त्यात बसचे चाक अडकून अपघात घडले आहेत. त्याशिवाय ही तुटलेली जाळी प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. येथील प्रसाधनगृह दुर्लक्षित आहे. त्यामूळे यात संभाव्य अपघाताची शक्यता पाहता ते तातडीने पुर्वस्थितीत येणे आवश्यक आहे.

‘त्या’ आंदोलनाच्या आठवणी जाग्या

दोन वर्षांपूर्वी पत्रे तुटल्याने या बसस्थानकाला गळती लागली होती. सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून त्यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडून छप्पर माडाच्या झावळ्यांनी शाकारले होते. अखेर महामंडळाला खडबडून जाग आल्यानंतर छपराची दुरुस्ती करण्यात आली. आज पुन्हा या आंदोलनाच्या आठवणी जाग्या झाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

SCROLL FOR NEXT