Goa 
गोवा

Goa: गोव्याच्या प्रतिमेला धक्का, 'त्या' आक्षेपार्ह वेबसाईट्सवर बंदी घालण्याची मागणी

एस्कॉर्ट सेवांबाबत सर्च केले जाते, तेव्हा प्रख्यात अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी अशा सेवांची जाहिरात करणाऱ्या वेबसाइट दाखवते.

Pramod Yadav

Goa: गोव्यातील एस्कॉर्ट सेवांबद्दल इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, गोव्याची प्रतिमा टिकवण्यासाठी अशा वेबसाइट्स हटवण्याची मागणी केली जात आहे.

मडगाव, पणजी किंवा गोव्यातील कोणत्याही शहर किंवा गावात एस्कॉर्ट सेवांबाबत सर्च केले जाते, तेव्हा प्रख्यात अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी अशा सेवांची जाहिरात करणाऱ्या वेबसाइट दाखवते.

दरम्यान, राज्यातून लैंगिक तस्करीचे उच्चाटन करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांनी गोव्याची प्रतिमा स्वच्छ आणि चांगली ठेवण्यासाठी अशा वेबसाइट हटवण्याची मागणी केली आहे.

बायलांचो साद आणि इतर संस्थांनी ऑनलाइन एस्कॉर्ट सेवांची जाहिरात करणाऱ्या साइट्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. साइट्सच्या ऑनलाइन ट्रॅकिंगसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, बायलांचो सादच्या संयोजक सबिना मार्टिन्स म्हणाल्या.

वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि गोव्याला महिलांच्या शोषणाचे ठिकाण म्हणून प्रदर्शित करणाऱ्या एस्कॉर्ट सेवांच्या ऑनलाइन जाहिराती बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांनी ताबडतोब पाऊले उचलली पाहिजेत, असे बायलांचो एकवटोच्या अध्यक्ष ऑडा व्हिएगस यांनी म्हटले आहे.

ARZ (अन्याय राहित जिंदगी) चे संस्थापक सदस्य अरुण पांडे यांनी या साइट्सची सत्यता लक्षात न घेता त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत त्यांनी गोव्यात अलिकडेच उघडकीस आलेल्या केनियन लैंगिक तस्करी रॅकेटकडे लक्ष वेधले.

केनियन प्रकरणात 'मसाज रिपब्लिक' वेबसाइटचा केल्याच उघडकीस आल्याचे पांडे यांनी नमुद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फाळणीपूर्वी पाकिस्तानला गेले, 1981 मध्ये पुन्हा गोव्यात आले; 44 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

Panajim: सहा दिवस उलटले, मांडवीत बुडालेली बोट काढण्यासाठी अजूनही हालचाली नाही

New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT