Smriti Irani  Dainik Gomantak
गोवा

Viral Post: 'तुमचा अहंकार आणि शर्म करो भाषण...', आता गोव्याला जा; स्मृती इराणींची नेटकऱ्यांकडून थट्टा

Viral Post: अमेठीतून स्मृती इराणी यांना देखील काँग्रेसच्या किशोरी लाल याच्या विरोधात पराभव पत्कारावा लागला.

Pramod Yadav

Smriti Irani Viral Post

लोकसभा निवडणुकीच्या मंगळवारी (दि.05) लागलेल्या निकालात भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना झटका बसला आहे. अमेठीतून स्मृती इराणी यांना देखील काँग्रेसच्या किशोरी लाल याच्या विरोधात पराभव पत्कारावा लागला.

काँग्रेसवर सडकून टीका करण्यात स्मृती इराणी कायम आघाडीवर असतात. अशात पराभवानंतर नेटकऱ्यांनी त्यांना गोव्याला जाण्याचा सल्ला देत विविध मजेशीर पोस्ट केल्या आहेत.

तुमचा अहंकार आणि संसदेतील शर्म करो भाषणाने तुम्हाला अमेठीतून मुक्त केले, अशी पोस्ट भावेश चौहान या युझरने एक्स या सोशल मिडियावर केली आहे.

राहुल गांधी यांनी मतदारसंघ बदलला आणि तुम्ही त्यांना भगोडा म्हटले, आता तुम्हा गोव्याला जा, अशी पोस्ट दुसऱ्या एका युझरने केली आहे.

आता गोव्याला जाणारी फ्लाईट बुक आणि सिली सोल्सची धुरा सांभाळा, अशी पोस्ट प्रितम नावाच्या एका व्यक्तीने केली आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांच्या मुलीचा गोव्यातील सिली सोल्स या अवैध कॅफे आणि बारवरुन आरोप झाले होते. याप्रकरणावरु स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी वादात सापडली होती.

याचवरुन आणखी एका युझने नेशन वॉन्ट्स टू नो... आता स्मृती इराणी त्यांचे घर दिल्लीतून गोव्यात शिफ्ट करतील?

तर, दुसऱ्या एका युझरने किशोरी लाल विजयी होणार हे स्पष्ट झाले असून, इराणी बॅग भरुन गोव्यातील सिली सोल्सच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

SCROLL FOR NEXT