Calangute Goa: गुगल मॅपमुळे पुणेकर गोव्यात चुकला, कळंगुट बीचवर पोलिसांनी केली कारवाई

Calangute Goa: पुण्यातून गोव्यात गेलेल्या एक पर्यटक गुगल मॅप फॉलो करत चुकून कळंगुट बीचवर दाखल दाखल झाला अन् अडकून पडला.
Calangute Goa
Calangute GoaGoa Police X Handle

Calangute Goa

गुगल मॅपवर बऱ्याचवेळा लोकेशन अपडेट नसल्याने अनोळखी ठिकाणी एखाद्याची फसगत होऊ शकते. अशीच एक घटना गोव्यातून समोर आली आहे. एक पुणेकर गोव्यात गेला असता त्याची गुगल मॅपमुळे चांगलीच पंचायत झाली शिवाय त्याला दंड देखील भरावा लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप दाभाडे या पुण्यातील व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. संदीप त्याची कार MH14 HK 0191 कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरुन घेऊन गेला आणि बीचवरील रेतीत त्याची कार रुतून पडली.

समुद्रकिनाऱ्यावरील चालस्टन बीच रिसॉर्टजवळ रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. कळंगुट पोलिस घटनास्थळी दाखल झाले व कारचालक संदीप विरोधात दंडात्मक कारवाई केली. गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर वाहन घेऊन जाण्यास बंदी आहे.

Calangute Goa
Pallavi Dempo: 'जनादेश मान्य, कॅप्टन यांचे अभिनंदन', पल्लवी धेंपे म्हणतात दक्षिणेत थोडक्यात पराभव

पण, समोर आलेल्या माहितीनुसार, संदीप यांचा हा घोळ गुगल मॅपमुळे झाल्याचे समोर आले आहे. संदीप गुगल मॅपने दाखवलेला रस्ता फॉलो करत असताना चुकून कळंगुट बीचवर येऊन अडकले.

दरम्यान, या परिसरात गस्तीवर असलेल्या सर्वेश नार्वेकर यांना एक अनोळखी कार बीचवर दिसल्याने त्यांनी संबधित व्यक्तीविरोधात कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com