babush monserrate | Goa News Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate : पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणी बाबूश मोन्सेरात यांना दिलासा; कारवाईची टांगती तलवार कायम

याप्रकरणी सीबीआयने 2014 मध्ये मोन्सेरात आणि इतर 35 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim : पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणाची सुनावणी आज मंगळवारी पार पडली. या सुनावणीकडे गोव्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. पणजीच्या जिल्हा सत्र न्यायालयात सकाळच्या सत्रात ही सुनावणी पार पडली. मागील सुनावणीच्यावेळी पणजी पोलीस स्थानकाचे तत्कालीन निरिक्षक तुषार लोटलीकर यांनी साक्षीदार म्हणून आपली जबानी नोंद केली होती. त्याची उलट तपासणी आजच्या सुनावणीत होणार होती. या तपासणीत साक्षीदार कसे सामोरे जातात आणि काय जबाब देतात यावर खटल्याचे भवितव्य अवलंबून होते.

दरम्यान, पोलीस निरिक्षक तुषार लोटलीकर वैद्यकीय कारणास्तव सुनावणीसाठी हजर न राहिल्याने पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणाची सुनावणी 22 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणीवेळी उलटतपासणी कोणत्याही परिस्थिती सुरू करावी लागेल असे न्यायालयाने स्पष्ट संकेत दिले.

मागील सुनावणीवेळी गुरुवारी उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात सरकारी वकिलांनी पुराव्यादाखल जळालेली दुचाकी, दगड, काचा, 'पोलिस निरीक्षकास निलंबित करा' असा मजकूर लिहिलेला फलक व रक्ताचे डाग असलेले कापड असा मुद्देमाल सादर केला. यावेळी न्या. शेरीन पॉल यांनी न्यायालयाबाहेर येऊन जळालेल्या दुचाकीची पाहणी केली होती.

नेमकं प्रकरण काय?

2008 साली पणजी पोलिस स्थानकावर जेनिफर मोन्सेरात, अतानासिओ ऊर्फ बाबुश मोन्सेरात, माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनी अनेक कार्यकर्त्यांना घेऊन हल्लाबोल केला होता. यावेळी स्थानकावर दगडफेक करण्यात आली होती. या हल्ल्यात मोठ्या पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचतर्फे सुरू होता. पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणाचा तपास पोलिसच करत असल्याने तो सीबीआयकडे देण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. सीबीआयने  2014 मध्ये मोन्सेरात आणि इतर 35 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. 

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात जे 2008 च्या पणजी पोलिस स्टेशनवरील हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात दोषी ठरल्यास त्यांना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT