Goa Job Dainik Gomantak
गोवा

Goa Job: खूशखबर! गोव्यात निर्माण होणार 3 लाख रोजगार; ‘रिलायन्स’ देणार गोमंतकीयांच्या हाताला काम

Reliance Work From Home Goa: इंटर्नशीप कार्यक्रमांतर्गत गोव्यात रिलायन्स कंपनी गोमंतकीयांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून देणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Reliance Work From Home Jobs Goa Internship Opportunity

साखळी: इंटर्नशीप कार्यक्रमांतर्गत गोव्यात रिलायन्स कंपनी गोमंतकीयांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून देणार आहे. यासाठी त्यांना सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त उमेदवारांची आवश्‍यकता आहे. याला वयाची मर्यादा नाही. गृहिणीही हे काम सहजपणे घरबसल्या करू शकतात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

उच्च शिक्षण संचालनालय, कौशल्य विकास संचालनालय, कॉर्पोरेट अफेअर्स, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने साखळी रवींद्र भवनात पंतप्रधान इंटर्नशीप व जॉब फेअर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर, कौशल्य विकास संचालनालयाचे गावकर, केंद्रीय मंत्रालयाचे जयंत आर्या आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्याच्या (Goa) औद्योगिक क्षेत्रात अनेक नोकऱ्या आहेत; पण त्या घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यासाठी पंतप्रधान प्रशिक्षणार्थी रोजगार (इंटर्नशीप कार्यक्रम) लाभदायक ठरणार आहे. या योजनेचा क्यूआर कोड स्कॅन करताच कोणत्या क्षेत्रात व आस्थापनात कोणती नोकरी आहे, याची संपूर्ण माहिती मिळेल.

सरकारी नोकरीसाठी अनुभव प्रमाणपत्र सक्तीचे!

अप्रेंटिसशीपप्रमाणेच इंटर्नशीप योजना युवकांसाठी फायदेशीर असून यातून एक वर्षाचा अनुभव घेतलेल्या उमेदवारांना सरकारी नोकऱ्या लवकर मिळतील. हे अनुभवाचे प्रमाणपत्र त्याच सरकारी पोर्टलवरून मिळते. यापुढे खासगी अनुभव प्रमाणपत्राशिवाय सरकारी नोकरी मिळणार नाही. कोणत्याही सरकारी नोकरीचे अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

भरघोस वेतनाची ग्वाही

इंटर्नशीप योजनेद्वारे कामात रूजू होणाऱ्या उमेदवाराला सकाळी ९ ते ५ या कामाच्या वेळेत कंपनी १५ ते २० हजार रुपये देते, तर केंद्रीय खात्याकडून या उमेदवारांना ४,५०० रुपये थेट बँक (Bank) खात्यावर जमा होतात. त्यामुळे नवीनच शिकून बाहेर पडणाऱ्या युवकांना भरघोस पगार मिळेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

SCROLL FOR NEXT