EV Charging Station In Panaji Dainik Gomantak
गोवा

EV Charging Station In Panaji: राजधानी पणजीत 8 ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरु; जाणून घ्या लोकेशन

EV Charging Station: रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडच्या सहकार्याने इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSCDL) शहरात सुरुवातीला 11 चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.

Manish Jadhav

पणजी: रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडच्या सहकार्याने इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSCDL) शहरात सुरुवातीला 11 चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. तत्पूर्वी, शहरात विविध ठिकाणी 8 चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. राजधानी पणजीत स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पार्किंगच्या ठिकाणी ही ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. चला तर मग शहरात ही 8 चार्जिंग स्टेशन कुठे उभारण्यात आली याविषयी जाणून घेऊया...

सांतिनेज- मधुबन सर्कल, काकुलो मॉल, कारपेंटर्स चॉइस.

मिरामार- मीरामार स्मार्ट पार्किंग, मीरामार बीच.

याशिवाय, मांडवी हॉटेल. बालभवन कांपाल. विशाल मेगामार्ट. सेंट्रल लायब्ररी, पाटो, अल्फ्रान प्लाझा.

40 चार्जिंग स्टेशन

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले होते की, ''शहरात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पाटो, पणजी शहर आणि दोनापावला अशा ठिकाणी एकूण 40 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्याठिकाणी दुचाकी आणि चारचाकी ईव्ही वाहने चार्जिंग करण्याची सुविधा असेल.'' दुसरीकडे, ईव्ही वाहनांना प्राधान्य दिले जात असल्याने शहरात ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन निर्माण केली जात आहेत.

चार्जिंग स्टेशनसाठी फोडले पदपथ!

चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी पदपथ फोडण्यात येत आहेत. पदपथ फोडून जो चौथरा निर्माण केला जातोय, त्याच्यासमोर चार्जिंग स्टेशन असल्याचे दर्शवण्यासाठी एक निळा खांबही उभा केला जातोय. अशाप्रकारे चौथरे आता शहरात इतर ठिकाणी करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

हणजूण येथे पर्यटकांच्या वाहनाची ट्रान्सफॉर्मरला धडक; दारूच्या बाटल्या सापडल्याने संशयाचे वातावरण!

Viral video: चालत्या कारच्या छतावर चढले अन्… तरुणांचा धोकादायक स्टंट व्हायरल; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

BCCI Election: बीबीसीआयच्या निवडणुकीत गोवा क्रिकेट असोसिएशनचा मतदार असणार का? शनिवारी होणार निर्णय

गोव्यात असणाऱ्या परराज्यांतील कंपन्यांनी येथेच मुलाखती घेऊन स्थानिकांना रोजगारास प्राधान्य द्यावे; CM सावंतांचे यार्वीच निर्देश

SCROLL FOR NEXT