Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बलात्कारी, खुनींची सुटका संतापजनक

गुजरात दंगल प्रकरण : पणजीत 28 रोजी पोस्टकार्ड अभियान

दैनिक गोमन्तक

पणजी: गुजरात दंगलीतील बलात्कारी व खुनींची मुदतपूर्व सुटका आणि त्यांच्या सुटकेबद्दल गुन्हेगारांचा सत्कार केल्याप्रकरणी आज पणजीत एकत्रित झालेल्या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला. बिल्किस बानो व इतर पीडितांवरील अत्याचारसंदर्भात काही संस्था व व्यक्तींनी एकत्रित जमा होऊन या कृत्याबाबत संताप व्यक्त केला. येत्या 28 रोजी पणजीतील आझाद मैदानावर पोस्टकार्ड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

(release of rapists and murderers is outrageous in goa)

या प्रकारामुळे समाजात असुरक्षितता निर्माण झाली आहे. विशेषतः जे साक्षीदार या प्रकरणात उभे राहिले, कार्यकर्ते व न्याय मिळवण्यासाठी काम करणाऱ्या व्यवस्थेतील लोकांना असुरक्षितपणा वाटू लागला आहे. पीडित बचावांचे, त्यांचे कुटुंबीय तसेच कायदेशीर व्यवस्थेद्वारे न्याय मिळवण्यासाठी लढणाऱ्या लोकांचे मनोधैर्य खचले आहे, असे सबिना म्‍हणाल्‍या.

मोठ्या संख्‍येने उपस्‍थित राहा!

बिल्किस बानो आणि लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या नागरिकांसोबत महिला संघटना, व्यावसायिक आणि सामाजिक संस्था आणि संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. महिला केंद्रे, महिला सेल, लैंगिक छळ प्रतिबंधक समित्या, बचत गट, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने स्वाक्षरी करण्यासाठी तसेच एकता व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सबिना मार्टीन्स यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT