Ponda News Dainik Gomantak
गोवा

Ponda News: ‘पीएफआय’शी संबंध; कुर्टीतून एकजण ताब्यात

देशभरात 17 ठिकाणी ‘एनआयए’कडून छापे

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेविरोधात आज राष्ट्रीय तपास यंत्रणेने गोव्‍यासह देशभरात छापे टाकले.

‘एनआयए’च्या पथकाने या संघटनेशी संबंधित असल्याच्या आरोपावरून कुर्टीतील मुफ्ती हनिफ महंमद एहरारला (42) याला ताब्यात घेतले. ही कारवाई आज पहाटे चारच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात करण्यात आली.

‘‘पीएफआय’च्या देशविरोधी कारवाया समोर आल्यानेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने यापूर्वी देशभर छापेमारी केली होती.

राज्यातील काही कारवायांसंदर्भात वा इतर प्रकरणांविषयी गोव्यात राहात असलेल्या यंत्रणेला माहिती असावी. त्या आधारेच ही कारवाई झाली’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

संशयित मुफ्ती हनिफ हा कुर्टीतील नुरानी नागा मशिदीत इमाम म्हणून कार्यरत होता. पण चार वर्षांपूर्वी एका आर्थिक संस्थेशी त्याचा संबंध असल्याचे आढळून आल्यावर त्याला नुरानी मशीद व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले होते.

मशिदीच्या सेवेतून काढून टाकल्यानंतर त्याने जवळच असलेल्या खातून मंजीलमध्ये खोली भाड्याने घेतली होती. बायको व मुलांसह मुफ्ती हनिफ येथे राहत होता.

पण त्याचे लागेबांधे ‘एनआयए’शी असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या निदर्शनास येताच त्याच्यावर कारवाई करण्यात आली. ‘एनआयए’ला फोंडा पोलिसांनी या कारवाईत सहकार्य केले.

कारवाईबाबत गुप्तता

देशविरोधी कृत्याचा संशय आणि केंद्राने बंदी घातलेल्‍या पीएफआयविरोधात एनआयएने चार राज्यांत 17 ठिकाणी छापेमारी केली. बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब आणि गोव्यात ही कारवाई करण्यात आली.

देशभरात एकाच वेळी केलेल्या या छापेमारीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. ‘एनआयए’कडून या कारवाईबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT