Court Canva
गोवा

Goa Crime: कारमधून ओढून शेतात मारहाण, स्क्रूड्रायव्हर - फोन जप्त; रेहबर खान हत्याप्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला

Rehbar Khan Death Case: रेहबर खान हत्याप्रकरणातील प्रमुख संशयित विकास यादव याचा जामीन अर्ज उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने चार्जशीटचा अभ्यास करून निर्णय दिला.

Sameer Panditrao

पणजी: रेहबर खान हत्याप्रकरणातील प्रमुख संशयित विकास यादव याचा जामीन अर्ज उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. संशयित हा साक्षीदारांना धमकावू शकतो व खटल्यात अडथळा आणू शकतो, असे सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

यादवचा जामीन अर्ज हा तिसऱ्यांदा फेटाळण्यात आला असून खटल्याची सुनावणी सुरू असताना तो न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे.सरकारी पक्षाचे वकील एस. पाटील आणि बचाव पक्षाचे वकील डी. धोंड यांच्या युक्तिवादांनंतर न्यायालयाने चार्जशीटचा अभ्यास करून निर्णय दिला.

न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले की, यादव हा या प्रकरणातील प्रमुख संशयित आहे. सरकारी पक्षाने मांडले की, घटनेदरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने यादवला काळ्या कारमधून रेहबर खानला बाहेर ओढून गिरी येथील शेतात मारहाण करताना पाहिले होते.

तसेच आरोपीच्या कबुलीजबाबाच्या आधारे पोलिसांनी हत्येत वापरलेले स्क्रूड्रायव्हर, मृताला नेण्यात वापरलेली कार, मृताचा शर्ट आणि मोबाईल फोन जप्त केले होते. दुसरीकडे, बचाव पक्षाने सांगितले की, १६ एप्रिल २०२४ रोजी दाखल झालेल्या पहिल्या पोलिस तक्रारीत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि त्यात यादवचे नाव नव्हते.

मुंगूल टोळीयुद्ध प्रकरण

मुंगुल टोळीयुद्ध प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी आणखीन एकाला अटक केली असून, प्रकाश हेलमा असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेला हा २४ वा संशयित आहे. प्रकाश हा या टोळीयुद्ध प्रकरणात फरार असलेला राजेश याचा भाऊ आहे.

दरम्यान, या गॅंगवॉर प्रकरणी वॉन्टेड असलेला अमोघ नाईक याच्या अटकपूर्व जामिनावर आता १६ नोव्हेंबर रोजी निवाडा होणार आहे.  अमोघ याचा अटकपूर्व जामिनाचा  अर्ज मंगळवारी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात सुनावणीस  आला असता वरील तारीख देण्यात आली. टोळी युद्धाच्यावेळी  प्रकाश हा घटनास्थळी हजर होता. त्यामुळे पोलिसांनी आता त्याच्याही  मुसक्या आवळल्या.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

''वीज खात्यान जाय तशे फोडून दवरल्यात रस्ते'' खड्डेमय रस्त्यांवरून पर्यटनमंत्र्यांचा 'वीजमंत्र्यांवर' निशाणा; Watch Video

भाजपची दादागिरी खपवून घेणार नाही; आपच्या कार्यकर्त्यांना मंत्री कामतांच्या जवळच्या व्यक्तीने धमकावल्याचा पालेकरांचा आरोप Video

Viral Video: आजीबाईंचा भोजपुरी गाण्यावर जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओचा धूमाकूळ; नेटकरी म्हणाले, 'जुने खेळाडू मैदानात उतरले...'

SCROLL FOR NEXT