Goa : Rehabilitation of stall holders in front of GMC? Dainik Gomantak
गोवा

Goa: जीएमसी समोरील स्टॉलवाल्यांचे पुनर्वसन ?

दोन दिवसापूर्वी बांबोळी येथील गोवा(Goa) वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवाराच्या बाहेरील गाडे जिल्हाधिकार्‍यांनी जमीनदोस्त केल्यानंतर आज या स्टॉलधारकांनी त्या ठिकाणी जमा होऊन त्यांचा व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली होती

दैनिक गोमन्तक

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या(Goa Medical Collage) समोरील जे गाडे जिल्हाधिकार्‍यांनी हटवले होते. त्यापैकी फळे व भाजी विक्रेत्यांना आज बसण्यास जागा. देण्यात आली. गुरुवारी गाडे हटवल्यानंतर आज या गाडेधारकांनी त्या ठिकाणी जमा होऊन त्यांचा व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली. मोठ्या प्रमाणात लोक जमल्यामुळे पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सांताक्रुजचे आमदार टोनी फर्नांडिस व सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी तेथे उपस्थित राहून मध्यस्थी करत मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. व जे स्थानिक गाडेचालक ,तसेच फळे व भाजी विक्रेते आहेत त्यांना जागा देण्याचे आश्वासन देत भाजी व फळ विक्रेत्यांना जागा मोजून दिली. त्यानंतर काही विक्रेते तेथे बसले. यावेळी बांबोळी कुडका व सांताक्रुज पंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांशी बोलून सर्वांचे पुनर्वसन केले जाईल. असे आमदार फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान दोन दिवसापूर्वी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवाराच्या बाहेरील गाडे जिल्हाधिकार्‍यांनी जमीनदोस्त केल्यानंतर आज या स्टॉलधारकांनी त्या ठिकाणी जमा होऊन त्यांचा व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली होती. आज फळविक्रेते आपला व्यवसाय सुरू करण्यास आले असता पोलिसांनी त्यांना तिथे अटकाव केला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कोणालाही तिथे सध्या व्यवसाय करता येणार नाही असे पोलिसांनी या जमावाला सांगितले त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र आता मुख्यमंत्रयांच्या आदेशामुळे हा तणाव निवळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT