Goa News Dainik Gomantak
गोवा

Hajj Yatra Registration: गोव्यातून हज यात्रेला जायचंय? समितीकडून नावनोंदणी सुरु, उरले केवळ 7 दिवस

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim, Goa

पणजी: मुस्लिम समजात खास महत्व असलेली यात्रा म्हणजेच हजची यात्रा, जिथे जगभरातून दरवर्षी अनेक भक्त मक्का-मदिनाला आवर्जून भेट देतात. दरवर्षीप्रमाणे वर्ष २०२५ मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी गोवा हज समितीकडून इच्छुक यात्रींसाठी अर्ज करता येणार आहे. समितीच्या वतीन इच्छुक भाविकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

हज यात्रेला जाण्यासाठी इच्छुक लोकं भारत हज समितीच्या hajcommittee.gov.in संकेतस्थळावर नाव नोंदणी करू शकतात किंवा Haj Suvidha या मोबाईल अप्लिकेशनचा वापर करूनही नाव नोंदणी करता येणं शक्य आहे. समितीकडून हज यात्रेसाठी नावनोंदणी करण्यासाठी येत्या 09 सप्टेंबरपर्यंत अंतिम तारीख आहे.

Hajj Committee Goa Notification

मात्र यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाजवळ मशीनद्वारे तपासाता येणारा आणि 15 जानेवारी 2026 पर्यंत वैध असणारा भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक असल्याची माहिती गोवा हज समितीने दिली आहे.

हज यात्रा म्हणजे काय?

हजची यात्रा ही मुस्लिम समाजातील एक महत्वाची यात्रा आहे. दरवर्षी अनेक भाविक सौदी अरेबियामधील मक्का-मदिनाला भेट देतात. मुस्लिम धर्मीयांमध्ये मक्का-मदिनाची यात्रा सर्वात पवित्र मानली जाते. मुस्लिम धर्मियांच्या मते यामुळे आयुष्याचे सार्थक होते.

धार्मिक मान्यतेनुसार हजची यात्रा ही मुस्लिम धर्मातील पाच महत्वाच्या स्तंभांपैकी एक आहे. याची सुरुवात मुस्लिम वर्षाच्या शेवटच्या महिन्यात होते तर पुढे 12 दिवसांपर्यंत ही यात्रा सुरु राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT