Ganesh Gavkar
Ganesh Gavkar Dainik Gomantak
गोवा

आपल्या योजना बेरोजगारीची समस्‍या शून्यावर आणणार; गणेश गावकर

दैनिक गोमन्तक

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांकडे प्राधान्‍याने लक्ष पुरवणार आहे. बेरोजगारी शून्‍यावर आणण्‍यासाठी प्रामाणिक प्रयत्‍न करणार आहे, असे सावर्डेचे भाजप उमेदवार गणेश गावकर यांनी दै. ‘गोमन्‍तक’ला दिलेल्‍या खास मुलाखतीत सांगितले. त्यांची दै. गोमन्‍तकने विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर खास मुलाखत घेतली, यावेळी त्यांनी इतरही प्रश्नांची उत्तरे दिलखुलास पणे दिली.

सावर्डे मतदारसंघासाठी आपल्या योजना काय आहेत?

राज्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना परत सुरू करून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणे, लोकांचे जमिनी मालकीहक्क मिळवून देणे, कुमेरी प्रश्न सोडवणे, खास वनाधिकारी नेमून एफआरसी प्रश्न सोडवणे अशी अनेक कामे असून लोकांना कशा प्रकारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्यादृष्टीने मतदारसंघात कामे केली जाणार आहेत. तसेच कुळे, तांबडी-सुर्ल, काले भागाला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. त्यातच दूधसागर धबधबा हा प्रसिद्ध असल्याने ‘इको टुरिझम’वर आपला भर राहणार आहे. त्यातून बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

तुमच्या कार्यकाळात झालेली कामे कोणती?

2012 च्‍या निवडणुकीत (Election) माझा विजय झाला तेव्हा मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावली होती. त्यातील काही पूर्ण झाली तर काही अजूनही चालू आहेत. धारबांदोडा तालुक्यासाठी नवीन उपजिल्हाधिकारी सरकारी इमारत, सातही पंचायतीत क्रीडामैदाने, त्यातील सावर्डे, साकोर्डा व धारबंदोडा या तीन मैदानांचे काम पूर्ण झाले आहे तर बाकी मैदानांचे सुरू आहे. जलस्रोत खात्यातर्फे नदीवर बंधारे, उसगाव, पिळये व काले येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राचे विस्तारीकरण, काले येथील स्मशानभूमी, रस्ते तसेच पाण्याचा प्रश्न अशी अनेक कामे मी सुरू केली होती. त्‍यातील काही पूर्णत्वास आली आहेत.

या मतदारसंघातील प्रमुख समस्या कोणत्‍या?

अजूनही काही ठिकाणी वीज, रस्ते व पाणी पोहचले नसल्याने लोकांना त्रास होत आहे. या समस्‍या सोडविण्याला माझे प्राधान्य असेल. बेरोजगारी ही प्रमुख समस्या असून धारबंदोडा येथे औद्योगिक वसाहत लवकरात लवकर सुरू करून रोजगार (employment) उपलब्ध करून देणे अशी अनेक कामे जी लोकांच्या समस्या दूर करेल याकडे माझे लक्ष आहे.

खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करणार?

कायदेशीर खाण (Mining) व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार असून केंद्र सरकारच्या सहकार्याने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली डंप धोरण अंमलात आणून हा व्यवसाय सुरू करणार आहोत.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांकडे प्राधान्‍याने लक्ष पुरवणार आहे. बेरोजगारी शून्‍यावर आणण्‍यासाठी प्रामाणिक प्रयत्‍न करणार आहे, असे सावर्डेचे भाजप उमेदवार गणेश गावकर यांनी दै. ‘गोमन्‍तक’ला दिलेल्‍या खास मुलाखतीत सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: पणजी कधीच सोडणार नाही, अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतील! मोन्सेरात

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT