Post Office Scheme Dainik Gomantak
गोवा

Recruitment: गोल्डन संधी! टपाल खात्याच्या गोवा विभागात 76 जागा रिक्त; ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरु

सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुम्हीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असाल तर सुवर्णसंधी आहे.

Manish Jadhav

सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुम्हीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असाल तर सुवर्णसंधी आहे. टपाल खात्याच्या गोवा विभागात 76 जागांची भरती करण्यात येणार आहे.

यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हे अर्ज https://in- diapostgdsonline.gov.in वर ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतील. अर्ज भरण्याची तारीख 15 जुलैपासून झाली असून अंतिम तारीख 5 ऑगस्ट आहे.

दरम्यान, ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्तर, सहायक शाखा पोस्टमास्तर, डाक सेवक अशा पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आले आहेत. गोव्यातील ग्रामीण डाक सेवकांच्या 76 जागा आहेत. याबाबत टपाल खात्याच्या गोवा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसरीकडे मात्र, गोव्यातील जागांवर स्थानिकांनाच संधी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. याआधी गोव्यातील टपाल खात्यात भूमिपुत्रांना डावलून परराज्यातील उमेदवारांना संधी देण्याचा आल्याचा आरोप झाला होता.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक स्थानिकांना डावलले जात असल्याच्या मुद्यावरुन आपली नाराजी बोलून दाखवली होती.

गोव्यातील (Goa) केंद्रीय कार्यालयात स्थानिक भूमीपुत्रांना संधी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. याबाबत नाईक यांनी केंद्राकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT