Goa job Recruitment

 
Dainik Gomantak
गोवा

Government Job: गोवा पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विभागात विविध पदांची भरती

10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गोवा पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विभागाने लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) सह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

दैनिक गोमन्तक

10वी आणि 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोवा पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा (Goa Animal Husbandry and Veterinary Services) यांनी लॅब असिस्टंट आणि स्टोअर कीपरसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी 1 जानेवारी 2022 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट goa.gov.in द्वारे 15 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण 73 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज (Goa job Recruitment) मागविण्यात आले आहेत. उमेदवार नियोजित अंतिम तारखेपूर्वी या पदांसाठी अर्ज करू शकतात. विहित अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

रिक्त पदांची संख्या

पशुवैद्यकीय सहाय्यक – 22 पदे

MTS – 29 पदे

LDC – 15 पदे

लॅब असिस्टंट – 2 पदे

स्टोअर कीपर – 2 पदे

इलेक्ट्रिशियन – 3 पदे

शैक्षणिक पात्रता

स्टोअर किपर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 12वी पास असणे अनिवार्य आहे. त्याच वेळी, पशुवैद्यकीय सहाय्यक पदासाठी, 10वी उत्तीर्णांसह, उमेदवाराकडे स्टॉक असिस्टंट प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. ITI पास उमेदवार MTS च्या पदांसाठी देखील अर्ज करू शकतात. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल.

या तारखा लक्षात ठेवा

अर्ज सुरू होण्याची तारीख - 1 जानेवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2022

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT