Goa BJP: नावेलीत भाजपने प्रथमच आपला उमेदवार उभा केलेला असून आप, कांग्रेस व तृणमूलमधील (TMC) मतविभाजनामुळे त्या पक्षाला चांगली संधी असताना तेथे भाजपमध्ये (BJP) बंडखोरीची चिन्हे दिसत आहेत. नावेली भाजप मंडळ उपाध्यक्षांनी काल पक्षाचा राजीनामा देण्यापाठोपाठ तेथून उमेदवारीवर दावा केलेले सत्यविजय नाईक यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याची तयारी चालविल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
या संदर्भात खातरजमा करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही, पण त्यांच्या निकटवर्तीयांकडून ते अपक्ष म्हणून लढणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या अनेक मित्रांनाही फोनबाबत हाच अनुभव आला. प्राप्त माहितीनुसार त्यांचा मुक्काम सध्या शांतीनगर येथेच आहे पण ते कोणालाही भेटत नाहीत.
भाजपने उल्हास तुयेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी नाईक यांच्या चाहत्यांनी दवर्लीत एक मेळावा घेऊन नाईक यांना भाजपने उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपश्रेष्ठींनी त्यांना बोलावून घेऊन समज दिली होती व तुयेकर हेच उमेदवार असल्याचे स्पष्ट केले होते.पण तरीही नाईक समर्थकांनी हेका कायम ठेवला होता. आता तुयेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाईक गटाने त्यांना अपक्ष म्हणून उभे रहाण्याचा सल्ला दिल्याचे कळते. तसे झाले तर भाजपसमोर ती समस्या ठरेल, असे मानले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.