Raw Mango Goa Dainik Gomantak
गोवा

Raw Mango Price: कैऱ्यांची आवक वाढली पण दर चढेच, खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम

Green Mango Prices: गेल्या दोन-तीन आठवडी बाजारात काही भागांतून कच्च्या कैऱ्या बाजारात उपलब्ध झाल्या होत्या. मात्र त्यांचे प्रमाण फारच कमी आणि त्या महाग होत्या.

Sameer Panditrao

डिचोली: यंदा कच्च्या कैऱ्या ‘आंबट’ होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या दोन आठवडी बाजारांच्या तुलनेत बुधवारी डिचोलीत कैऱ्यांची आवक काहीशी वाढली होती. आवक वाढली असली, तरी कैऱ्या मात्र अजूनही महागच आहेत.

घाऊक बाजारात ४०० ते ५०० रुपयांना शंभर नग विकले जात आहेत. मात्र, पुढील आठवड्यापर्यंत बाजारात कैऱ्यांची आवक वाढण्याची शक्यता आहे, असे भाजी विक्रेते पुनाजी गवस यांनी सांगितले.

यंदा मार्च महिना संपून गेल्यावर आठवडी बाजाराच्या दिवसांपर्यंत डिचोलीत अपेक्षेप्रमाणे कच्च्या कैऱ्यांची आवक झालेली नव्हती. गेल्या दोन-तीन आठवडी बाजारात काही भागांतून कच्च्या कैऱ्या बाजारात उपलब्ध झाल्या होत्या. मात्र त्यांचे प्रमाण फारच कमी आणि त्या महाग होत्या.

आहारातील एक घटक असलेल्या कच्च्या कैऱ्या खळात घालतानाच या कैऱ्यांपासून लोणचे आदी पदार्थ बनविण्यात येतात. मात्र, यंदा कच्च्या कैऱ्यांचे प्रमाण घटले असून त्या महागही झाल्याने अनेकांना जिभेला मुरड घालावी लागणार आहे. पुढील काही दिवसांत बाजारात कच्च्या कैऱ्यांची आवक होण्याची शक्यता असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कैऱ्यांचे प्रमाण कमी राहणार असल्याचे असे संकेत मिळत आहेत.

सीमेलगतच्या भागातून आवक

महाराष्ट्र तसेच कर्नाटक सीमेलगतच्या भागातून कच्च्या कैऱ्या बुधवारी डिचोलीच्या बाजारात विक्रीस उपलब्ध झाल्या होत्या. गावठी कैऱ्या ४०० रुपये, तर कर्नाटक भागातून आलेल्या कैऱ्या ५०० रुपये शंभर नग या दराने विकण्यात येत होत्या. असंतुलित हवामानामुळे यंदा आंबा लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कैऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील आठवड्यात कैऱ्यांची आवक वाढेल, असे विक्रेते पुनाजी गवस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Comeback: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याचं होणार कमबॅक; चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Mitchell Starc Record: रेकॉर्ड ब्रेक! मिचेल स्टार्कनं रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये ठरला सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा गोलंदाज

FC Goa vs FC Arkadag: एफसी गोवाची झुंजीनंतर हार, एफसी अर्कादाग संघाचा 3-0 दणदणीत विजय

Congo Ebola Outbreak: कांगोत इबोला व्हायरसचा हाहाकार! 20 दिवसात 1000 जणांचा मृत्यू, 4000 हून अधिक लोक मृत्यूच्या दाढेत; 10 वर्षांतील सर्वात मोठा उद्रेक

Shravan Month: क्षणात सर, क्षणात सोनेरी ऊन अन् चहूकडे हिरवाईचा साज! निसर्गसौंदर्य आणि सणांची पवित्र अनुभूती देणारा श्रावण पुन्हा अवतरला

SCROLL FOR NEXT