Ravindra Bhavan Margao Pai Tiatrist Hall  Dainik Gomantak
गोवा

Pai Tiatrist Hall: ऐन हंगामात ‘पाय तियात्रिस्‍त’ सभागृह होणार बंद, IFFI साठी करणार कायापालट; सप्‍टेंबरमध्ये दुरुस्‍ती

Ravindra Bhavan Margao Pai Tiatrist Hall: यंदाच्‍या नोव्‍हेंबर महिन्‍यात होणाऱ्या इफ्‍फीसाठी मडगावच्‍या रवींद्र भवनचे ‘पाय तियात्रिस्‍त’ सभागृह सुसज्‍ज करण्‍यात येणार आहे.

Sameer Panditrao

मडगाव,: एकाबाजूने कला अकादमीच्‍या दीनानाथ मंगेशकर सभागृहाला घरघर लागलेली असतानाच मडगावच्‍या रवींद्र भवनमधील पाय तियात्रिस्‍त सभागृहही इफ्‍फीसाठी सुसज्‍ज करण्‍यासाठी सप्‍टेंबर महिन्‍यात बंद ठेवण्‍यात येणार आहे. यामुळे तियात्र माेसमावर त्‍याचा विपरित परिणाम होणार आहे, अशी भीती तियात्र निर्मात्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

यंदाच्‍या नोव्‍हेंबर महिन्‍यात होणाऱ्या इफ्‍फीसाठी मडगावच्‍या रवींद्र भवनचे ‘पाय तियात्रिस्‍त’ सभागृह सुसज्‍ज करण्‍यात येणार आहे. यासाठी या सभागृहातील आसन व्‍यवस्‍था बदलण्‍याबरोबरच ध्‍वनियंत्रणाही बदलण्‍यात येणार आहे. यासाठी संपूर्ण सप्‍टेंबर महिना लागणार असल्‍याने या कालावधीसाठी हे थिएटर सर्वांसाठी बंद राहणार आहे.

पणजीतील कला अकादमी सभागृह तियात्र सादरीकरणासाठी फारसे याेग्‍य नाही, अशा परिस्‍थितीत सर्व तियात्रिस्‍तांचे गृहितक मडगावच्‍या पाय तियात्रिस्‍त सभागृहावर अवलंबून होते. मात्र, हेही सभागृह सप्‍टेंबर महिन्‍यात बंद राहणार आहे. त्‍यामुळे तियात्रांवर विपरित परिणाम होणार, अशी भीती तियात्रिस्‍तांकडून व्‍यक्‍त केली जात आहे.

मडगाव रवींद्र भवनचे सदस्‍य सचिव आग्‍नेल फर्नांडिस यांच्‍याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, इफ्‍फीसाठी हे सभागृह सुसज्‍ज करण्‍यासाठी सप्‍टेंबर महिन्‍यात नूतनीकरणाचे काम हाती घेण्‍याची शक्‍यता आहे, असे त्‍यांनी सांगितले. याबाबतीत अजूनही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

मात्र, इफ्‍फी संचालनालयाचे प्रतिनिधी आणि गोवा मनोरंजन सोसायटीचे पदाधिकारी यांच्‍या एका शिष्‍टमंडळाने काही दिवसांपूर्वी मडगाव रवींद्र भवनाची पाहणी केली हाेती. इफ्‍फीसाठी हे सभागृह सुसज्‍ज करण्‍यासाठी त्‍यांनी मुख्‍य सभागृहात काही बदल सुचविले असून हे बदल करण्‍याचे काम हाती घेतल्‍यास हे सभागृह बंद ठेवावे लागेल, असे ते म्‍हणाले.

यासंबंधी अधिक माहितीसाठी मडगाव रवींद्र भवनचे अध्‍यक्ष राजेंद्र तालक आणि कला व संस्‍कृती खात्‍याचे संचालक सगुण वेळीप यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांच्‍याशी संपर्क होऊ न शकल्‍याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

कलाकारांसाठी नुकसानकारक

मडगावचे एक रवींद्र भवन बंद असले तरी गोव्‍यातील इतर ठिकाणी सभागृहे आहेत याकडे लक्ष वेधले असता, तियात्राचा प्रेक्षक फक्‍त मडगाव आणि काही प्रमाणात पणजी येथेच गर्दी करतो. इतर ठिकाणी फक्‍त एक-दोन शोच चालू शकतात. त्‍यामुळे मडगाव हे तियात्राचे मुख्‍य केंद्र असून हेच जर बंद असेल तर तियात्र कलाकारांसाठी ते नुकसानकारक ठरेल, असे मत युवा तियात्रिस्‍त एलिसन द कुरतरी यांनी व्‍यक्‍त केले.

तियात्रिस्‍तांसाठी माेठी अडचण

‘तियात्रिस्‍तांची संघटना’चे अध्‍यक्ष आर्नाल्‍ड डायस यांना याविषयी विचारले असता ते म्‍हणाले, सप्‍टेंबर आणि ऑक्‍टोबर हे दोन महिने तियात्रांसाठी महत्त्वाचे असतात. सासष्‍टीत माेठ्या प्रमाणावर तियात्रप्रेमी उपलब्‍ध असल्‍याने मडगाव हेच तियात्रांसाठी मुख्‍य केंद्र असते. मात्र, या ऐन मोसमात जर ‘पाय तियात्रिस्‍त’ सभागृह बंद राहिले तर तियात्रिस्‍तांसाठी ती एक माेठी अडचण ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TVS Jupiter: खास तुमच्यासाठी! दमदार इंजिन, स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्ससह 'टीव्हीएस जुपिटर'चे नवे मॉडेल लॉन्च

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

SCROLL FOR NEXT