Govind Gaude, Canacona Artists Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: रवींद्र भवनात कोणत्याच त्रुटी राहणार नाहीत; मंत्री गावडे

Ravindra Bhavan Canacona: काणकोण कलाकार संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मंत्री गावडे यांची भेट घेउन निवेदन सादर केले

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद: काणकोण येथील रवींद्र भवनाचा लोकार्पण सोहळा ऑगस्ट अखेरीस करण्यात येईल. तसेच या रवींद्र भवनात कोणत्याच त्रुटी राहणार नाहीत याकडे लक्ष देण्यात येईल, असे आश्‍वासन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे दिले.काणकोण कलाकार संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मंत्री गावडे यांची भेट घेउन निवेदन सादर केले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष नारायण देसाई, सचिव हरिश्चंद्र खोलकर, अजित पैंगीणकर व अन्य सदस्य उपस्थित होते. काणकोण कलाकार संघ मागच्या २० वर्षांपासून गानतपस्विनी अंजनीबाई लोलयेंकर आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्या नावे संगीत संमेलन भरवत आहे. आजवर ही संगीत संमेलने श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या राजांगणात घेण्यात आली. मात्र यंदाचे संमेलन येथील रवींद्र भवनमध्ये भरवण्याचा निर्णय संघाच्या आमसभेने घेतला आहे.

तसेच या रवींद्र भवनात संघासाठी एखाद्या खोलीची सोय करण्यात यावी, तसेच नोव्हेंबर महिन्यात संगीत संमेलन भरविण्यास परवानगी देण्यात यावी, या संबंधीचे निवेदन उपाध्यक्ष नारायण देसाई आणि सचिव हरिश्चंद्र खोलकर यांनी मंत्री गावडे तसेच खात्याचे संचालक सगुण वेळीप यांना सादर केले. यावेळी संघाचे अजित पैंगीणकर व अन्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

Davorlim: फ्लॅटमध्ये राहायचे 20 जण, चालायचा बेकायदेशीर मदरसा; रुमडामळ-दवर्लीत 17 अल्‍पवयीन मुलांची सुटका

SCROLL FOR NEXT