Abhishek Sharma Dainik Gomantak
गोवा

Abhishek Sharma: 'अभिषेक' झटपट क्रिकेटमधील सर्वोत्तम! भारताच्या माजी खेळाडूने उधळली स्तुतीसुमने; म्हणाला 'युवराजसिंग सारखीच..'

Ashwin praises Abhishek Sharma: आशियाई करंडकातील ‘सुपर-४’ लढतीत ३९ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी साकारणाऱ्या भारताच्या अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर चोहोबाजूंनी कौतुक करण्यात आले.

Sameer Panditrao

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्धच्या आशियाई करंडकातील ‘सुपर-४’ लढतीत ३९ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी साकारणाऱ्या भारताच्या अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर चोहोबाजूंनी कौतुक करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन याने अभिषेकचे स्तुती करताना म्हटले की, अभिषेक हा सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमधील भारताचा सर्वोत्तम खेळाडू आहे. युवराजने सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय व टी-२० क्रिकेट गाजवले. अगदी त्याचप्रमाणे अभिषेकमध्येही या दोन्ही प्रकारात चमक दाखवण्याची क्षमता आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या आशियाई क्रिकेट करंडकात सलग चार सामन्यांमध्ये विजय संपादन करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ‘सुपर फोर’ फेरीमधील पहिल्या लढतीत पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियाला बांगलादेशशी दोन हात करावयाचे आहेत.

या लढतीत विजय मिळवल्यास भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे. याच कारणामुळे बांगलादेशविरुद्धची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. दोन देशांमधील अव्वल दर्जाच्या फिरकीपटूंमधील द्वंद्व याप्रसंगी पाहायला मिळणार आहे.

भारत आणि बांगलादेश लढतीला नेहमी एक वेगळी किनार असते. त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, बांगलादेश संघाने २००७ च्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले होते. बांगलादेशचा संघ आजही या विजयाची प्रेरणा घेऊन मैदानात उतरतो. दुसरी गोष्ट म्हणजे खेळात सातत्य दिसत नसले, तरी बांगलादेशी खेळाडू नेहमी आपणच सर्वोत्तम अशा थाटात मैदानात उतरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर भैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Sattari Crime: बिहारच्या व्यक्तीवर गोव्यात अज्ञाताकडून गोळीबार, सत्तरीतील धक्कादायक घटना; परिसरात भीतीचे वातावरण

Elephant in Goa: न्हयेंन बुट्टा, शेतांन लोळ्टा! 'ओंकार' अजूनय तांबोशाच; Watch Video

Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

Seva Pakhwada: राज्याच्या, देशाच्या प्रगतीचे चित्र उमटललेल्या कलाकृती; 21 व्या शतकातील भारत आणि गोवा प्रदर्शन

SCROLL FOR NEXT