Goa Electric Solar Ferry Dainik Gomantak
गोवा

Goa Electric Solar Ferry: उंदिर कुडतरताहेत गोव्यातील एकमेव इलेक्ट्रिक सोलर फेरी बोट

मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले- नुकसान मोठे नाही!

Akshay Nirmale

Goa Electric Solar Ferry Boat: जवळपास वर्षभरापूर्वी सुरू झालेली राज्यातील पहिली आणि एकमेव इलेक्ट्रिक-कम-सोलर फेरी प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने वापराविना पडून आहे.

दरम्यान, बोटीच्या वायरिंग हार्नेसवर उंदरांचे साम्राज्य असल्याचे दिसून आले आहे. तथापि, जलवाहतूक मंत्री सुभाष फळदेसाई यांनी उंदरांनी केलेले नुकसान फार मोठे नाही, असे सांगितले आहे.

दरम्यान, आठवडाभरापासून या हार्नेसच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. उंदरांनी केलेले नुकसान फार मोठे नाही, असे फळदेसाई यांनी ठामपणे सांगितले आहे.

उंदिरांनी विजेच्या वायरी कुडतरल्या आहेत. आपल्या घरात देखील उंदरांच्या अशा समस्येला सामना करावा लागतो. हे नुकसान फार मोठे नाही. सोलर फेरी बोटच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे.

केवळ वायरी बदलायाच्या आहेत. काही तारा पुन्हा जोडायच्या आहेत. हे काम फार खर्चिक नाही.

कॅप्टन ऑफ पोर्ट्सच्या फ्लोटिंग कॉंक्रिट जेट्टीसह गेल्यावर्षी या बोटीचे लोकार्पण करण्यात आले होते. या बोटीसाठी सुमारे 3.97 कोटी रुपये खर्च आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT