Salcete and Mormugao taluka fungus found in rice Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! सासष्टी, मुरगावच्या शेकडो शिधापत्रिकाधारकांना किडलेला व बुरशी आलेल्या तांदळाचे वाटप

निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप केल्याने तालुक्यातील नागरिक संतप्त झाले आहेत.

Pramod Yadav

सासष्टी, मुरगाव तालुक्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांना किडलेल्या व बुरशी आलेल्या तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप केल्याने दोन्ही तालुक्यातील नागरिक संतप्त झाले आहेत. अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन तात्काळ तांदूळ बदलून द्यावा अशी मागणी शिधापत्रिकाधारकांनी केली आहे.

अनेकांना सडलेला आणि आळ्या झालेला तांदूळ मिळाला आहे. सध्या सोशल मिडियावर निकृष्ट धान्य मिळाल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

वितरीत करण्यात आलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा असून, दक्षिण गोव्यातील अनेकांना अशा प्रकारचा तांदूळ एप्रिल आणि मे महिन्यात देखील देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिधापत्रिकाधारकांनी निकृष्ट दर्जाचा तांदूळ नाकरला असून, ताज्या तांदळाची मागणी केली आहे.

मडगाव, फातोर्डा आणि इतर भागातील तांदळाच्या साठ्यात लहान लहान किडे आणि भुंगे झाल्याचे आढळून आले आहे. अनेक स्वस्त धान्य दुकानात असलेले धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शिधापत्रिकाधारकांनी केला आहे.

सरकार गरिबांना वाटप करत असलेल्या स्वस्त धान्यबाबत गंभीर नसल्याचा आरोप शिधापत्रिकाधारकांनी केला आहे. अनेक गरिब कुटुंब रेशनच्या धान्यावर उदरनिर्वाह करतात त्यामुळे त्यांची अशा लोकांप्रती सरकारने थोडी कणव दाखवावी असे शिधापत्रिकाधारकांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही शिधापत्रिकाधारकांनी त्यांना एप्रिल आणि मेमध्ये निकृष्ट दर्जाचा धान्य साठा आल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी आलेला तब्बल 26 टन तांदूळ निकृष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून गोदामात पडून असल्याचा दावा दुकानदारांनी केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Milk Analogue Products: अस्सल दुधाच्या नावावर स्वस्त 'ॲनालॉग' ची विक्री; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना मेन्यू आणि बोर्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक

Horoscope 23 Saptember 2026: पैशांच्या बाबतीत बुधवार महत्त्वाचा दिवस! संपत्ती आणि समृद्धीचे नवे मार्ग मोकळे; 'या' राशींच्या बँक बॅलेन्समध्ये होणार भरघोस वाढ

Goa Rakshan Yatra: काँग्रेस कार्यकर्त्यांना 'ऊर्जा'; शेकडोंच्या उपस्थितीत 'गोवा रक्षण यात्रे'ला प्रारंभ, 40 मतदारसंघांत 27 दिवसांचा दौरा

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

SCROLL FOR NEXT