Ratan Tata At Goa Dainik Gomantak
गोवा

Ratan Tata: टाटांचा अखेरचा ‘वीकेन्ड’ गोव्यात! समुद्र साठवला नयनात; ३० वर्षांपूर्वीच्या आठवणींनाही उजाळा

Ratan Tata Last weekend: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी आयुष्यातील शेवटचा वीकेन्ड गोव्यात व्यतीत केला. ३० वर्षांपूर्वी वास्तव्य केलेल्या ताज फोर्ट रिसॉर्टमधील कुटिरातच त्यांनी वास्तव्य केले. त्यांना समुद्राची फार ओढ होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Ratan Tata Goa Visit

पणजी: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी आयुष्यातील शेवटचा वीकेन्ड गोव्यात व्यतीत केला. ३० वर्षांपूर्वी वास्तव्य केलेल्या ताज फोर्ट रिसॉर्टमधील कुटिरातच त्यांनी वास्तव्य केले. त्यांना समुद्राची फार ओढ होती. त्यामुळे शुक्रवार दुपारपासून रविवार दुपारपर्यंतचा जास्तीत जास्त वेळ त्यांनी समुद्र डोळ्यांत सामावून घेण्यातच घालविला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टाटा ३० वर्षांपूर्वी गोव्यात आले होते, तेव्हा ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ नाईक यांना भेटण्यासाठी आग्वाद येथे गेले होते. तेव्हा त्या हॉटेलचे व्यवस्थापक मदन साळगावकर हे होते. त्यांच्या मध्यस्थीने त्या हॉटेलमध्ये काही स्थानिक तरुणांना नोकरी देण्याची मागणी करण्यासाठी ही भेट होती, अशी आठवण नाईक यांनी सांगितली.

आताही शुक्रवार, ४ रोजी दुपारी ते गोव्यात आले. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते उतरले. त्यावेळी त्यांचे छायाचित्र कर्मचाऱ्यांनी टिपले. मुंबईतील पत्रकार योगेश नाईक यांच्या हाती ते लागले आणि टाटांंनी इस्पितळात दाखल होण्याआधीचे तीन दिवस गोव्यात सुट्टी व्यतीत केल्याची माहिती सर्वांसमोर आली.

उद्योगपती रतन टाटा ३० वर्षांपूर्वी गोव्यात आले होते, तेव्हाही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह छायाचित्र टिपले होते. त्यानंतर शेवटच्या दौऱ्यात रविवारीही त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत छायाचित्र टिपले होते. ४ ऑक्टोबरला ते मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले, तेव्हा त्यांच्या स्वागताचे छायाचित्र टिपले गेले. त्यांचा हा शेवटचा दौरा असेल, जाहीररीत्या टिपलेले शेवटचे छायाचित्र असेल, असे तेव्हा कोणालाही वाटले नसेल.

‘फोर्ट रिसॉर्ट’ मधील वास्तव्यावर ब्लॉग

रविवारी (ता.६) अस्वस्थ वाटल्याने मुंबईला परतण्यापूर्वी रतन टाटा यांनी ताज फोर्ट रिसॉर्टमधील कुटिरात वास्तव्य केले होते. त्या कुटिरालगतच्या एका कुटिरात राहिलेल्या महिलेने ब्लॉग लिहिला आहे. शुक्रवारी दुपारी बग्गीतून ते कुटिरापर्यंत आले होते, अशी आठवण त्या लेखिकेने लिहिली आहे. स्वागत फलकांसह काहीजण उभे होते. दोन बग्गी आल्या. एका ज्येष्ठाने पाहून स्मितहास्य केले, असा अनुभव ब्लॉगवर लिहिला आहे. टाटा सतत समुद्राकडे पाहात बसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT