Sanquelim Municipal Elections Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council Election 2023 : धर्मेश सगलानी यांच्यासमोर रश्‍मी देसाई यांचे आव्हान

दैनिक गोमन्तक डिजिटल

साखळी नगरपालिकेत ‘टुगेदर फॉर साखळी’चे प्रमुख नेते धर्मेश सगलानी यांच्यासमोर भाजपच्या रश्‍मी देसाई यांनी आव्हान उभे केले आहे. या पॅनेलचे दुसरे नेते प्रवीण ब्लेगन बिनविरोध निवडून आल्याने सगलानी यांचे भवितव्य सध्या टांगणीला लागले आहे.

देसाई यांच्यामागे भाजपने सर्व ताकद लावली आहे. त्याशिवाय या ठिकाणी अपक्ष म्हणून युवा उमेदवार फुलारी ओंकार दोघांपैकी कोणाला पराभूत करणारी मते घेणार हेही रविवारीच कळणार आहे.

भाजपसाठी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. अडीच टक्के मतदान वाढल्याने वाढलेला मतांचा टक्का बदलाच्या बाजूने जाणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसला साखळीत जिवंत ठेवण्याचे काम ज्या सगलानी यांनी केले आहे, त्यांना आपल्या अस्तित्वासाठी रिंगणात उतरावे लागले आहे.

विधानसभेला हाताला आलेला घास हिरावून नेल्याचे दिसून आल्यानंतर आता नगरपालिकेतही आपल्याला पराभूत करण्यासाठी भाजप सर्व यंत्रणा कामाला लावणार हे त्यांनी ओळखले आहे. तरीही प्रभागातील जनता आपल्याच पाठीशी राहणार, असा आत्मविश्‍वास सगलानी यांना वाटतो.

निस्वार्थ सेवेचे फळ मिळणार

निस्वार्थपणे केलेली कामे आणि लोकांच्या विश्‍वासाला तडा न जाऊ देण्याचे पाळलेले तत्त्व सगलानी यांनी पाळले आहे. त्यामुळे तेच याठिकाणी बाजी मारतील, असा आत्मविश्‍वास त्यांच्या समर्थकांना आहे.

रवींद्र भवनाच्या मागील बाजूस असलेल्या मतदान केंद्राबाहेर भाजप उमेदवाराचे २०-२५ पाठिराखे नजरेस पडत होते, तर सगलानी यांच्याजवळ चार-पाच जण त्यांचे समर्थक दिसत होते. लोक मतदानातून व्यक्त होतील, असे त्यांना वाटते.

देसाई यांना या प्रभागात निवडून आणण्यासाठी भाजपने सर्व स्तरावर यंत्रणा राबविली आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना किती होणार हेसुद्धा निकालानंतरच समजून येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

SCROLL FOR NEXT