Rare India Pangolin rescued in Kavlem Ponda Dainik Gomantak
गोवा

कवळे येथे विहिरीत पडले दुर्मिळ खवले मांजर, वन्यजीव बचावकर्त्यांनी केले उपचार

वन्यजीव बचावकर्त्यांनी मांजराला बाहेर काढून त्याच्यावर यशस्वी उपचार केले.

Pramod Yadav

Rare India Pangolin rescued in Kavlem Ponda

दुर्मिळ असणारे खवले मांजर कवळे येथे विहिरीत पडल्याने जखमी झाले. वन्यजीव बचावकर्त्यांनी मांजराला बाहेर काढून त्याच्यावर यशस्वी उपचार करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. चरण देसाई आणि त्यांच्या टीमने हे बचावकार्य केले.

जखमी अवस्थेत सापडलेल्या या खवले मांजरावर वैद्यकीय तज्ञांनी उपचार केले व काहीकाळ निरीक्षण करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले.

कवळे येथे विहिरीत खवले मांजर पडल्याची माहिती वन्यजीव बचावकर्ते चरण देसाई आणि त्यांच्या टीमला मिळाली. देसाई यांच्यासह अंकित गावडे, गायत्री भालके आणि मधुराज नाईक हे सर्व घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, एक तास घटनास्थळी मांजराला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

अखेर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले, पण ते जखमी असल्याने त्याला वैद्यकीय उपचारांची गरज होती. वैद्यकीय उपचार केल्यानंतर मांजराला काहीकाळ निरीक्षणखाली ठेवण्यात आले.

यशस्वी उपचारानंतर मांजराला सुखरूपपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 30 जून रोजी ही घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT