Court Dainik Gomantak
गोवा

Panaji News : मुख्य साक्षीदारांच्या जबानी अभावी बलात्कारप्रकरणी संशयित निर्दोष

ज्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली त्यातून संशयिताविरुद्धचा आरोप सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने आदेशात केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या संशयित सूरज जाधवची विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

सुनावणीवेळी पीडितेची तसेच तिच्या बहिणीची साक्ष महत्वाची होती, ती सरकारी वकिलांनी तपासली नाही. संशयिताची ओळख पटवण्यात तक्रारदार मुलीची आई अपयशी ठरली. ज्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली त्यातून संशयिताविरुद्धचा आरोप सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने आदेशात केले आहे.

संशयित व पीडितेची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यात वैद्यकीय तपासणी अहवालही नकारात्मक आला होता. संशयिताविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने त्याने हा गुन्हा केला आहे, याबाबत शंका वाटते.

सरकारी वकील पुरावे सादर करण्यास अपयशी ठरले आहेत,असा मुद्दा उपस्थित केला आहे त्यात तथ्य आहे. घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांनी तेथील छायाचित्रे काढली नव्हती तसेच काही नमुनेही घेतले नव्हते.

त्यामुळे पुराव्याअभावी संशयिताला बलात्कार तसेच पोक्सो कायद्याखाली निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे न्यायालयाने निवाड्यात म्हटले आहे. पीडित मुलगी व संशयित हे जुने गोवे येथील शेजारी असलेल्या दोन वेगवेगळ्या दुकानांत कामाला होते.

त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. जून २०१४ मध्ये संशयित सूरज याने १६ वर्षीय मुलीला स्कूटरवर बसवून तिला तेथीलच एका देवळाजवळील झाडीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Slums: गोव्यात 14 झोपडपट्ट्यांत सुमारे 27 हजार लोक! 2011ची आकडेवारी; संख्‍या बरीच मोठी असण्‍याची शक्‍यता

Betul: दारूच्या नशेत पोलिसांवर दगडफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण; 6 जणांची पोलिस कोठडीत रवानगी

Mapusa: रस्त्यातून 'इलेक्ट्रिक शॉक'! म्हापसा मार्केटमधील विचित्र प्रकार; व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण

Bits Pilani: आतापर्यंत 4 जीव गेले, अजून किती हवे? ‘बिट्स पिलानी’तील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस आक्रमक

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्‍यमंत्र्यांचा दिल्ली दौरा ‘त्‍या’साठी?

SCROLL FOR NEXT