Goa Molestation Case Dainik Gomantak
गोवा

Goa Molestation Case: ‘त्या’ आंबटशौकीन शिक्षकाने केले यापूर्वीही अनेक विनयभंग

एका सहकारी शिक्षिकवर लैंगिक अत्‍याचार

दैनिक गोमन्तक

Goa Molestation Case

रमेश गावकर या शिक्षकाने यापूर्वी मळकर्णे आणि आंबावली या दोन ठिकाणी शिकविताना विद्यार्थिनी आणि आपल्या शिक्षक सहकाऱ्यांचाही विनयभंग करण्‍याचा प्रयत्‍न केला होता, असे पोलिस तपासात पुढे आले आहे. ही माहिती उघडकीस आल्‍यानंतर फातर्पा शाळेतील विद्यार्थ्यांच्‍या खवळलेल्‍या पालकांनी अशा शिक्षकाला शिक्षण खात्‍याने सेवेत न ठेवता त्‍याला त्‍वरित बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे.

बुधवारी एका विद्यार्थिनीच्‍या पालकाने विनयभंगाची तक्रार नोंदविल्‍यानंतर कुंकळ्‍ळी पोलिसांनी गावकरला अटक केली होती. मात्र, त्‍याला सोडण्‍यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आणला जात आहे, अशी चर्चा सुरू झाल्‍यानंतर पालकांनी शाळेच्‍या आवारात गर्दी करून त्या शिक्षकाला बडतर्फ करावे, अशी मागणी लावून धरली.

शाळेच्‍या आवारात मोठ्या प्रमाणात पालक जमा झाल्‍याने पोलिसांना पाचारण करण्‍यात आले. स्‍थानिक आमदार एल्‍टन डिकॉस्‍ता हेही तेेथे धावून आले. यावेळी दक्षिण गोव्‍याच्‍या वन स्‍टॉप केंद्राच्‍या संचालक आवदा व्‍हिएगस यांनाही पोलिसांनी बोलावून घेतले.

दक्षिण गोव्‍याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी सांगितले की, या शिक्षकाला पॉक्‍सो कायद्याखाली आणि गोवा बाल (संरक्षण) कायद्याखाली अटक केली आहे.

या शिक्षकावर खात्‍यांतर्गत कारवाई करण्‍यात यावी, यासाठी आम्‍ही शिक्षण खात्‍यालाही कळविले आहे.

सहकारी शिक्षिकेवरही अत्याचार

यावेळी पोलिसांनी केलेल्‍या चाैकशीत गावकर हा मळकर्णे येथील शाळेत शिकवित असताना त्‍याच्‍या एका सहकारी शिक्षिकेने त्‍याच्‍या विरोधात लैंगिक अत्‍याचाराची तक्रार केली हाेती. त्‍याही पूर्वी आंबावली येथील शाळेत शिकवित असताना एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्‍याचा प्रयत्‍न केला होता. मात्र, त्‍यावेळी काही राजकारणी त्‍याच्‍या मदतीला धावून आल्‍याने कुठलीही पोलिस तक्रार न हाेता तो सुटला होता. मात्र, नंतर त्‍याची त्‍या शाळेतून मळकर्णेला बदली केल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT