Thivim Water Pipeline Burst: थिवी चर्चजवळ मुख्य जलवाहीनी फुटली; हजारो लीटर पाणी वाया

सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक घटनास्थळी
Thivim Water Pipe Line Burst
Thivim Water Pipe Line Burst Dainik Gomantak
Published on
Updated on

Thivim Water Pipeline Burst: थिवी चर्चजवळ मुख्य जलवाहीनी गुरूवारी सकाळी फुटल्याने येथून हजारो लीटर पाणी वाया गेले. 700 एमएमची ही जलवाहीनी आहे. या पाईपलाईनला अचानक गळती लागल्याने बरेच पाणी वाया गेले.

ही माहिती कळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. काही तासात ही पाईपलाईन दुरूस्त होऊ शकते.

Thivim Water Pipe Line Burst
Sonsodo Garbage Issue: सोनसडोचा 20 टन कचरा आता काकोडा प्रकल्पाकडे; उच्च न्यायालयाचे निर्देश

जॉईंट सुटल्याने या पाईपलाईनमधून मोठे कारंजे उडत होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाणीपुरवठा विभागाने वेळीच दखल घेऊन पाणीपुरवठा बंद केला. सध्या दुरुस्तीचे काम हातात घेतले असून तासाभरात हे दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ही पाईपलाईन रस्त्यालगत आहे. पाईपलाईन फुटल्याने त्यातून पाण्याचा फवारा मोठ्या प्रेशरने स्त्यावर उडत होता. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे भिजून गेला होता. तसेच वाहनधारक येथून जाताना एकाकडेने जात होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com