Mapusa N Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Mapusa News : लोकांचे पैसे बुडविले, स्‍वत:चे पैसे सुरक्षित ठेवले; सभेस्थळी भाजपाचे झेंडे तसेच मुख्य स्टेजसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा कटआउट उभारला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

म्‍हापसा, काँग्रेसचे उत्तरेतील उमेदवार रमाकांत खलप हे बँक लुटारू आहेत. त्यांनी म्हापसा अर्बन बँक लुटली. लोकांचे पैसे बुडविले. परंतु आपले व आपल्या नातेवाईकांचे पैसे त्यांनी सुरक्षितपणे काढून घेतले, असा घणाघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

म्‍हापशात आयोजित भाजपच्‍या जाहीर प्रचारसभेत मुख्‍यमंत्री बोलत होते. ते म्‍हणाले, दक्षिणेचे उमेदवार कॅप्टन विरियातो यांना संविधानाचा आदर नाही. गोव्यावर संविधान लादले गेले म्हणत त्‍यांनी संविधानाचा अपमान केला. अशा उमेदवाराला घरी पाठवा. भाजपने विकासाचे राजकारण केले तर काँग्रेसने केवळ जाती-धर्माचे राजकारण केले, असे ते म्‍हणाले.

महिलांची मोठी गर्दी...

सभेस्थळी भाजपाचे झेंडे तसेच मुख्य स्टेजसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा कटआउट उभारला होता.

सभेला पोलिसांमुळे छावणीचे स्वरुप. लोकांच्या हातात मोदींचे तसेच कमळाचे फलक.

उन्हापासून बचावासाठी उपस्थितांना भाजपाच्या टोप्या दिलेल्या. सभेस महिलांची संख्या लक्षवेधी. सायंकाळी ६.३वाजता सभेला सुरवात, तर रात्री ८.३५ वा. सभा संपुष्टात.

दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेपोंनी आपण केवळ समाजकारणासाठी राजकारणात आल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थितांना धन्यवाद दिले.

मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, काँग्रेसवाले देशाचे तुकडे करुन विभाजन करु पाहते. मात्र त्यांना यश मिळणार नाही. ते धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करु पाहते.

मंत्री विश्वजित राणे म्हणाले, सर्व्हे रिपोर्टनुसार मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्तेत येणार. केवळ भाजपा सरकारच रोजगाराची निर्मिती करु शकते.

उपसभापती जोशुआ डिसोझा, मंत्री विश्वजित राणे, गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर, रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडेंनी मनोगत व्यक्त केले.

अमित शहा उवाच...

गोमंतकीयांचे प्रत्येक मत हे मोदींना असेल. गोव्यातील दोन्ही उमेदवार जिंकल्यास भाजपची ४०० पारची यात्रा यशस्वी होईल.

काँग्रेसच्या कार्यकाळात घोटाळेच घोटाळे व्हायचे. मात्र मोदी सरकारावर पंचवीस पैशांचा आरोप झाला नाही.

मोदींना अविरत देशवासीयांची सेवा केली. गुजरात मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानच्या कार्यकाळात एकदाही मोदींनी सुट्टी घेतली नाही. उलट राहुल गांधी हे वारंवार विदेशी दौऱ्यावर जातात.

इंडिया आघाडीकडे पंतप्रधानचा चेहरा नाही. आघाडीतील नेतेगण पंतप्रधान पद आपापसात विभागून घेण्याची त्यांच्यात स्पर्धा आहे.

- कोरोनासारखी महामारी किंवा इतर आपत्कालीन वेळेला तोंड देणे किंबहुना नक्षलवाद, आतंकवाद संपविण्याचे काम केवळ भाजपाचे मोदी सरकारच करु शकते.

- स्वतःच्या मुलाबाळांचा विचार करणारे गोव्यातील गोरगरीब जनता, शेतकरी, आदिवासी, युवावर्गाचा विचार करु शकत नाही

छत्रपती शिवाजी महराजांनी सप्तकोटेश्वर मंदिराचे पुननिर्माण केले होते. त्याच मंदिराचा पुनर्विकास व मानसन्मान देण्याचे काम गोव्यातील सावंत सरकारने केले.

मोदी सरकारने जनतेला मोफत धान्यपुरवठा केला. कोरोना महामारीवेळी देशवासीयांना मोफत लस उपलब्ध करून दिली.

कोरोना लसीवर राजकारण करणारे काँग्रेसचे राहुल गांधी व प्रियंका गांधी हे काळोखाच्या अंधारात जाऊन त्यांनी मोदी सरकारने निर्मिती केलेली लस घेतली.

- काँग्रेसच्या कार्यकाळात गोव्याला फक्त ६ हजार ३०० कोटी रुपये आले. उलट मागील दहा वर्षांत भाजपाच्या केंद्र सरकारने गोव्याला विकासकामांसाठी ३५ हजार कोटी रुपये दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पंजाबची चिवट फलंदाजी! सामना अनिर्णित; 3 गुण कमावत गोव्याची अव्वलस्थानी झेप

Horoscope: सुखप्राप्तीचा दिवस! कार्तिक पौर्णिमा देणार भरभरुन; 'या' राशींसाठी राजयोग

Goa Accident Deaths: चिंताजनक! गोव्‍यात 308 दिवसांत तब्‍बल 216 जणांचे बळी; अपघाती मृत्यूंची वाढती संख्या

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेससाठी फॉरवर्ड भूमिका बदलेल?

AFC Champions League: FC Goa भिडणार रोनाल्डोच्या टीमशी! अल नस्सरविरुद्ध परतीचा सामना; सौदी अरेबियन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान

SCROLL FOR NEXT