Rati Kankonkar Dainik Gomantak
गोवा

'माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले'? रामा यांच्या पत्नीची पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

Rati Kankonkar Files Complaint: रती काणकोणकर यांनी डीजीपींची भेट घेऊन महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. त्यांनी विचारले की, "माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले?"

Manish Jadhav

Rama Kankonkar Case: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभर राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर राज्यातील तमाम सामजिक कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षांनी या हल्ल्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याचदरम्यान, आता रामा काणकोणकर यांच्या पत्नी रती काणकोणकर यांनी थेट पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली.

पोलीस स्टेटमेंट लीक झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह

रती काणकोणकर यांनी डीजीपींची भेट घेऊन महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. त्यांनी विचारले की, "माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले?" पोलीस तपासादरम्यान दिलेल्या विधानाचे तपशील माध्यमांपर्यंत पोहोचल्यामुळे या प्रकरणाच्या तपासातील गोपनीयता आणि निष्पक्षता धोक्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस ठाण्यात दिलेले स्टेटमेंट सार्वजनिक झाल्यामुळे रती काणकोणकर यांनी स्थानिक पोलिसांच्या तपासावर अविश्वास व्यक्त केला.

गुन्हे शाखा किंवा निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी

स्थानिक पोलिसांकडून निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी असल्याचा दावा करत रती काणकोणकर यांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून किंवा निवृत्त उच्च न्यायालयाच्या (High Court) न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी केली आहे. तपास पूर्णपणे स्वतंत्र आणि पारदर्शक व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.

रामा काणकोणकर हे गोव्यातील अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर आवाज उठवणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावरील हल्ल्यामुळे सामाजिक सुरक्षा आणि राजकीय हस्तक्षेपावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे विरोधी पक्षांनी भाजप (BJP) सरकारला घेरले असून या प्रकरणाचा तपास आणि पुढील कारवाई अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT