Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: 'त्‍यांना सरकार, भाजपचे नाव बदनाम करायचे होते हे दिसून येते', काणकोणकरांच्या आरोपांवरती तानावडेंचे प्रत्त्युत्तर

Rama Kankonkar: पणजीतील पक्ष कार्यालयात रविवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री माविन गुदिन्‍हो आणि सुभाष शिरोडकर यावेळी उपस्‍थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोमेकॉतून डिस्‍चार्ज मिळाल्‍यानंतर रामा काणकोणकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. सरकार, भाजप आणि मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिमा मलीन करण्‍याच्‍या हेतूनेच त्‍यांनी आरोप केले. यामागे ज्‍यांचा हात आहे, त्‍यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी राज्‍यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केली.

पणजीतील पक्ष कार्यालयात रविवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री माविन गुदिन्‍हो आणि सुभाष शिरोडकर यावेळी उपस्‍थित होते. हल्ला झाल्‍यापासून ते डिस्‍चार्ज मिळेपर्यंत रामा किंवा त्‍यांच्‍याशी संबंधित असलेल्‍यांकडून वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्‍ये करण्‍यात आली. काणकोणकर यांच्‍यावर हल्ला झाल्‍यानंतर सोयरू वेळीप यांनी दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार पोलिसांनी तत्‍काळ याप्रकरणी आठजणांना अटक केली.

त्‍यानंतरचा संपूर्ण तपास पोलिसांनी पारदर्शकपणे केला आहे. सरकारनेही त्‍यांना पूर्णपणे सुरक्षा दिली. त्‍यांच्‍यावरील उपचारांकडेही बारकाईने लक्ष दिले. तरीही काणकोणकर यांनी डिस्‍चार्ज मिळताच आपल्‍यावरील हल्ल्‍यात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा हात असल्‍याचा संशय असल्‍याचा दावा केला. यातूनच त्‍यांना सरकार आणि भाजपने नाव बदनाम करायचे होते हेच दिसून येते, असेही तानावडे म्‍हणाले.

रामा यांच्‍यावरील हल्ला निंदनीय आहे. अशा घटना गोव्‍यात घडता कामा नयेत; परंतु रामांनी जे आरोप केले, त्‍यातून त्‍यांचा बोलविता धनी वेगळाच असल्‍याचे दिसून येते. पोलिसांनी या धन्‍याचा शोध घेऊन त्‍याची चौकशी केली पाहिजे, असे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर म्‍हणाले. तर, रामा यांचा न्‍यायव्‍यवस्‍था, सरकार आणि पोलिसांवरही विश्‍‍वास नाही, तर त्‍यांचा विश्‍‍वास नेमका कुणावर आहे?

असा सवाल मंत्री गुदिन्‍हो यांनी केला. चुकीचे आरोप करून काणकोणकर जनतेत संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. परंतु, गोमंतकीय जनता त्‍यांच्‍या आरोपांवर विश्‍‍वास ठेवणार नाही, असेही माविन म्हणाले.

सराईत गुन्‍हेगार कोणत्‍याच पक्षाचे नसतात : शिरोडकर

मुख्‍यमंत्री किंवा मंत्री नेहमीच समाजाच्‍या उद्धारासाठी रात्रंदिवस झटत असतात. विविध कार्यक्रमांच्‍या निमित्ताने त्‍यांना अनेकजण भेटत असतात. त्‍या सर्वांचीच पार्श्वभूमी त्‍यांना माहीत नसते, असे म्‍हणत सराईत गुन्‍हेगार हे कोणत्‍याही पक्षाचे नसतात. ज्‍यांची सत्ता असेल त्‍यांच्‍या बाजूने ते जात असतात, असे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 'महादेवाचा दिव्य आशीर्वाद 'या' 3 राशींच्या डोक्यावर: सोमवारी दूर होतील जीवनातील सर्व समस्या; वाचा दैनिक राशिभविष्य

Babasaheb Ambedkar Statue: चोपडे सर्कलजवळ उभारणार डॉ. आंबेडकरांचा भव्‍य पुतळा! आमदार आरोलकर यांची घोषणा

Serendipity Festival: नृत्य, नाट्य आणि संगीत आणि दृश्यकलांचा उत्सव! वेध सेरेंडीपिटीचे..

Vaibhav Suryavanshi Vice Captain: युवा तारा चमकला! 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची उपकर्णधारपदी नियुक्ती, 'या' संघाचं करणार नेतृत्व

Borim Bridge: बोरी पूल दुरुस्ती सुरू! राशोल-शिरोडा फेरीवर वाढला ताण; वाहतूक कोंडीची समस्या

SCROLL FOR NEXT