Rama Kankonkar Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: रामा मानसिकदृष्ट्या ठीक नाही, पत्नीची स्पष्टोक्ती; चौकशीबाबत कार्यकर्त्यांचा पोलिसांना सवाल

Rama Kankonkar Assult: काही माध्यमांनी तो जबानी देत नाही अशी बातमी करून रामा काणकोणकर यांच्यावर दोष देण्याचा प्रयत्न केला.

Sameer Amunekar

पणजी: रामा काणकोणकर यांच्या पत्नीने काही माध्यमांवर अफवा पसरवल्याचा आणि विषय वळवित असल्याचा आरोप करताना स्पष्ट केले की, रामा मानसिकदृष्ट्या चांगल्या अवस्थेत नाही. काही माध्यमांनी तो जबानी देत नाही अशी बातमी करून रामा काणकोणकर यांच्यावर दोष देण्याचा प्रयत्न केला. खरेच पोलिस आणि डॉक्टरांनी माहिती दिली असेल तर त्या डॉक्टर आणि पोलिसांचे नाव जाहीर करावे असे आव्हान त्यांनी माध्यमांना दिले.

दरम्यान, हा विषय दुसरीकडे वळविण्यासाठी माध्यमांची मदत घेतली जाते का, असा प्रश्न अशा घडामोडीमुळे निर्माण होतो, असे देखील त्यांनी म्हटले.

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील चौकशीची दिशा आणि गेल्या आठवडाभरात कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट तपास अधिकाऱ्याशी भेट घेऊन परिस्थितीची चौकशी केली. यावेळी रामा काणकोणकर यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या.

गोमेकॉच्या वैद्यकीय अधीक्षकांनीदेखील रामा काणकोणकर सध्या ‘मेंटली फिट नाही’ असे सांगितले असल्याचे रामा काणकोणकर यांच्या पत्नीने स्पष्ट केले. तरीही काणकोणकर जबानी देत नाही, असे सोशल मीडियासह काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणे हे लोकांचे लक्ष चुकविण्याचा प्रयत्न असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

लोकांचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न

सध्या रामा काणकोणकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारण्याच्या प्रक्रियेत आहे. जेव्हा वैद्यकीय अधिकारी स्वतः सांगत आहेत की, काणकोणकर मानसिकदृष्ट्या ठीक नाही, तेव्हा त्यांची जबानी दिली जात नाही असे कसे म्हणता येईल? उलटपक्षी अशा बातम्या लोकांचे लक्ष वळविण्याचे काम करत आहेत, असे काणकोणकर यांच्या पत्नी रती काणकोणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT