पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोज हाच असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे. त्याशिवाय अन्य संशयित फ्रान्सिस नाडरने हा हल्ला वैयक्तिक वैमनस्य, ऑनलाइन चिडवाचिडवी आणि सोशल मीडियावरील खिल्लीमुळे केला व त्याने जेनिटो हाच या कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
रामा काणकोणकर यांच्यावर करंजाळे गार्डन, चिल्ड्रन्स पार्क येथे झालेल्या निर्घृण प्राणघातकी हल्ल्याच्या तपासात पोलिसांनी अखेर आरोपपत्र दाखल केले आहे. १३७१ पानी आरोपपात्रमध्ये संशयित फ्रान्सिस नाडरने हा हल्ला सोशल मीडियावरील खिल्लीमुळे आखण्यात आल्याचे स्पष्ट केले.
८ आरोपींविरुद्ध गंभीर कलमे
आरोपी : ८ (सर्व न्यायालयीन कोठडीत)
साक्षीदार: ४९
मुद्देमाल: ३२ वस्तू जप्त
आरोपपत्रामध्ये नमूद केलेल्या मुद्यानुसार, फ्रान्सिस नाडरने तपास अधिकाऱ्यांसमोर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही जेनिटो कार्दोजोच्या सांगण्यावरून रामा काणकोणकर यांना रोखले. प्रथम केबल वायरने मारहाण केली, त्यांच्या चेहऱ्यावर गाईचे शेण फेकले. हल्ला करण्यापूर्वी व नंतरही कार्दोजो आम्हाला सतत सूचना देत होता.
१. हल्ल्याच्या दिवशी जेनिटो हा रामा काणकोणकर यांच्या हालचालीवर पाळत ठेऊन होता. तो व्हॉट्सअॅप ग्रुप आणि व्हॉइस कॉलद्वारे सर्व संशयितांना काणकोणकर कोठे कोठे पोचत आहेत, याची माहिती देत होता. या प्रकरणी पोलिसांनी ४९ साक्षीदारांची यादी आरोपपत्रासोबत सादर केली आहे.
२. फ्रान्सिस नाडरच्या कबुलीनुसार रामाला त्यांनी वायरने मारहाण केली, चेहऱ्यावर शेण फेकले. हा सर्व प्लॅन जेनिटो कार्दोजोनेच आखला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा हल्ला पूर्वनियोजित, कटकारस्थानपूर्वक आणि सूडाच्या हेतूने केलेला होता हे स्पष्ट झाले.
३. करंजाळे येथे १८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी रामा काणकोणकर यांच्यावर ७ जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. प्रथम रामाला अडवून त्याला मारहाण केली आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर शेण फेकले व बेदम मारहाण केली.
४. मारहाणीनंतर रामाला गंभीर जखमी अवस्थेत १०८ रुग्णवाहिकेतून गोवा वैद्यकीय महाविद्यालयत दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आणखीन तपास करायचा असल्याने न्यायालयाने त्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही एका अर्जाद्वारे पोलिसांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.